Makar Sankranti Haldi Kunku Ukhane: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त हमखास होणारा हट्ट पुरवण्यासाठी संक्रांत स्पेशल उखाणे!
Ukhane| File Photo

जानेवारी माहिना आला की महिलांची वाण लुटण्याची धामधूम सुरू होते. त्यामध्येही नवं लग्न असलं की सारंचं नवीन असल्याने मकर संक्रांतीचा पहिला सण, हळदी कुंकू कार्यक्रम, हलव्याचे दागिने आणि काळे कपडे याची उत्सुकता देखील अधिक असते. या वर्षी देखील 14 जानेवारीला मकरसंक्रांती पासून ते 7 फेब्रुवारी अर्थात रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. अनेकदा नवविवाहितेला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये उखाणा घेण्याचा हट्ट केला जातो. मग आयत्या वेळी तुमची धावाधाव होऊ नये म्हणून हे काही उखाणे लक्षात ठेवा. नक्की वाचा: Sankranti 2022: सुयश टिळक-आयुषी भावे ते सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी साजरी केली पहिली संक्रांत; पहा फोटोज .

मकर संक्रांत आणि उखाणे

तीळाचा हलवा चांदीच्या वाटीत

--- चं प्रेम माझ्या आनंदाचं गुपित

संसाराला आमच्या नजर न लागो कुणाची

--- चं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

तिळगूळात तीळाचा स्नेह आणि गूळाचा गोडवा

--- आणि --- चा कायम आनंद राहो जोडा

मंगलकार्याच्या दिवशी दाराला तोरण

--- चं नाव घेते आज हळदी कुंकवाचं कारण

तीळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी

--- ची मीच आहे राणी

लग्नानंतर पहिली पाच वर्ष सवाष्ण महिला सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाचा डब्बा, कंगवा/फणी, आरसा, बांगड्या, काळे मणीसर अशा वस्तू वाण म्हणून लुटतात तर त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे वस्तू 'वाण' म्हणून लुटण्याची पद्धत असते. हे देखील नक्की वाचा: Haldi Kunku 2022 Rangoli Design: हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स.

मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात जसा साजरा केला जातो तसाच तो दक्षिण भारतामध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून त्याचं सेलिब्रेशन होतं. यंदा कोविड 19 रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्वीप्रमाणे एकमेकांच्या घरी जाऊन मोठ्या उत्साहात हे कार्यक्रम केले जाऊ शकत नाहीत त्यामुळे यंदा अत्यंत साधेपणाने आणि घरच्या घरीच हळदी कुंकू करा आणि सुरक्षित रहा.