Tilgul | File Image

Haldi Kunku Invitation Card Format in Marathi: नववर्षामधील पहिला सण हा मकरसंक्रांत (Makar Sankranti) असतो. संक्रांतीला पुरूषवर्गाला पतंगबाजीचं आकर्षण असतं तर महिला नटून थटून आपल्या नातेवाईक, मैत्रिणींकडे संक्रांतीचं वाण लुटायला हजेरी लावतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सवाष्ण महिला आपल्या घरी आजुबाजूच्या महिलांना, मैत्रिणींना घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलावतात. या निमित्ताने एकमेकींकडे वाण लुटलं जातं. वाण म्हणजे अर्थात एक खास भेटवस्तू महिलांना दिली जाते. सोबतच तीळगूळ, फुटाणे देण्याची पद्धत आहे. मग तुमच्या घरी देखील महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी खास निमंत्रण पत्रिका WhatsApp Messages,  SMS,  Facebook,  Instagram  Messages द्वारा देत शेअर करू शकता.

मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो. यामध्ये तुमच्या वेळेनुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. यंदा रथसप्तमी 4 फेब्रुवारी पर्यंत आहे. यादरम्यान कधीही तुम्ही घरी हळदी कुंकू आयोजित करू शकता.  Haldi Kunku Special Ukhane: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हे मराठी उखाणे नक्की मदत करतील नाव घेण्याचा गोड हट्ट पूर्ण करायला!

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे निमंंत्रण

लुटून वाण साजरा करू सण उत्साहात

रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर आमच्या घरी हळदी कुंकवाचे आयोजन केले आहे तरीही आपण संध्याकाळी 7-9.30 दरम्यान जरूर उपस्थित रहावे.

आपली नम्र,

(नाव)

(संपर्क क्रमांक)

पत्ता

---------------------------

नाते तुमचे आमचे

हळूवार जपायचे

तिळगूळ हलव्यासंगे

अधिक दृढ करायचे

रविवार 26 जानेवारी दिवशी आमच्या कडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण जरूर या आनंदामध्ये सहभागी व्हा

विनित,

पत्ता-

------------------------------------

आमच्या कडून दिनांक ..... दिवशी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही संध्याकाळी ... वाजता हजेरी लावत या सोहळ्यात येत आनंद द्विगुणित कराल ही अपेक्षा!

आपली,

पत्ता-

-----------------------------

चला सयांनो संस्कृती जपू..

रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित

हळदी कुंकू कार्यक्रमासाठी

आमच्या घरी अगत्याने येणे करावे..

तारीख:

वेळ:

पत्ता:

रब्बी हंगामातील पिक हातात आलेलं असतं. त्यामुळे साधारणपणे या दिवसात चैतन्याचं वातावरण असतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांतीचा सण हा फार महत्त्वाचा असतो. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात.