
Happy Makar Sankranti 2024 HD Images: यंदा मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) 15 जानेवारीला साजरी होत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, या वर्षी 15 जानेवारी रोजी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 02:54 वाजता मकर राशीत प्रवेश करेल, त्यामुळे 15 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाईल. मकर संक्रांतीचा सण हिंदू कॅलेंडरच्या आधारे साजरा केला जातो, ज्यामध्ये सूर्याच्या संक्रमणाची गणना लक्षात ठेवली जाते.
सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. कधी 14 जानेवारीला तर कधी 15 जानेवारीला सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. अशा परिस्थितीत सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. या वर्षी 15 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. मकर संक्रांतीनिमित्त WhatsApp Status, Messages, Wallpapers द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊन हा सण अधिक उत्साहाने आणि आनंदाने साजर करू शकता. (हेही वाचा - मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टी दान केल्यास होईल देवाची कृपा; वाचा सविस्तर)
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!!

झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7.15 ते सायंकाळी 6.21 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. त्याचवेळी मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी 12.15 ते रात्री 9.06 पर्यंत महा पुण्यकाळाची वेळ असणार आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याची वेळ 2 दिवसांपूर्वी सकाळी 5.07 ते 8.12 पर्यंत आहे.