
Happy Makar Sankranti 2021: पौष महिन्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti). यंदा मकर संक्रांती 14 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांती पासून उत्तरायणाला (Uttarayan) सुरूवात होते. हा संक्रमणाचा काळ मोठ्या उत्साहाने भारत भर साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये लोहरी, दक्षिण भारतात पोंगल म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. मग ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार सुरू झालेल्या या नव्या वर्षामधील पहिला सण तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देत, व्हॉट्सअॅप मेसेजेस, स्टेट्स (WhatsApp Status), टेलिग्राम मेसेजेस,GIFs ग्रिटींग्सच्या माध्यमातून नक्की शेअर करू शकता. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी संदेश,HD Images, Quotes, Wallpapers द्वारा शेअर करण्यासाठी लेटेस्टलीच्या टीम कडून तयार करण्यात आलेली ही ग्रिटींग्स, मेसेजेस तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईक, प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करू शकता. Makar Sankranti 2021 Messages: मकर संक्राती निमित्त मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा.
महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणजे पतंगांचा खेळ, गूळपोळी, तेलपोळी, तीळाचे लाडू, रेवडी, हलवा अशा गोड पदार्थांची रेलचेल घेऊन येणारा सण. महिला वर्गासाठी देखील हा सण आनंदाचा असतो. या निमित्ताने सवाष्ण महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. वाण लूटतात. मग नववर्षातील संक्रांतीचा पहिला सण हर्ष उल्हासित वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी आज सोशल मीडियात मराठमोळे मेसेज शेअर करून सुरूवात करा. Makar Sankranti Rangoli Design: मकर संक्रांतीला दारापुढे काढा 'या' सुंदर सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन .
मकर संक्रातीच्या शुभेच्छा

थंडीतला गारवा, मायेतील ओलावा आणि प्रेमातील गोडवा
असाच कायम रहावा ही सदिच्छा
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरून सारे हेवेदावे
तीळगुळाचा आज स्वाद घ्यावा
नव्या वर्षाच्या पहिल्या सणासह
बंध नात्याचा अधिक दृढ व्हावा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तीळ आणि गुळासारखीच घट्ट रहावी
आपली मैत्री घट्ट आणि गोड
मकर संक्रांतीला आज तीळगूळ घे
आणि फक्त गोड गोड बोल!

ऊब तीळाची, गोडवा गुळाचा
आपुलकीचा सण हा मकरसंक्रांतीचा!

आज आठवण सूर्याची साठवण प्रेमाची
संधी तीळगुळासंगे नातं अधिक दृढ करण्याची
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला
मकर संक्रांती सणाच्या खूप सार्या शुभेच्छा!
हॅप्पी मकर संक्रांती
दरम्यान नवं लग्न झालेल्या दांपत्यांसाठी देखील मकर संक्रांतीचा सण खास असतो. या निमित्ताने पुन्हा उभयतांचे कोड कौतुक केले जाते. काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने यांनी नटून थटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर नवजात बालकांचं बोरन्हान करण्याची प्रथा आहे. संध्याकाळच्या वेळेस बच्चापार्टी मोकळ्या मैदानात पतंगबाजीचा आनंद लूटतात. या सणाच्या निमित्ताने आभाळात देखील रंगबेरंगी पतंगाच्या स्पर्धा सुरू असतात. मग घराघरात आनंद घेऊन येणारा हा सण दणक्यात साजरा करण्यासाठी सज्ज व्हा.