रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे. काही ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवती ही रांगोळी काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. (Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा )
आता अवघ्या काही दिवसांवर जानेवारी म्हणजेच नवर्षातला पहिला सण मकर संक्रांत येत आहे. या सणाच्या दिवशी कोणती रांगोळी काढायची हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.आज आपण पाहणार आहोत मकर संक्रातीला काढता येतील अशा सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाइन.
मकर संक्रांत स्पेशल पतंग डिझाइनरांगोळी
मकर संक्रांत स्पेशल पोस्टर रांगोळी
बोटांच्या सहाय्याने काढता येणारी रांगोळी डिझाइन
मकर संक्रांत स्पेशन पैठणी , नथ रांगोळी
आहेत की नाही मकर संक्रांतीसाठी सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन.तेव्हा यंदा संक्रातीला दारापुढे यातलीच एक रांगोळी नक्की काढा.लेटेस्टली मराठीच्या टीम कडुन तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.