Makar Sankranti 2021 Halwyache Dagine (Photo Credits:YouTube)

Makar Sankranti Special Halwyache Dagine: हिंदू पंचांगानुसार, भारतात वर्षाच्या सुरुवातीला पहिला येणारा सण म्हणजे 'मकर संक्रांती.' (Makar Sankranti) या सणाची लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वांमध्ये विशेष रेलचेल असते. लहान मुलांना या सणाचे विशेष महत्व असते कारण या दिवसांत लहान मुलांसह (Small Kids) मोठी माणसे देखील आकाशात मनसोक्त पतंग उडविण्याची मजा घेतात. तर स्त्रिया या दिवशी आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून हळदी कुंकूवाचा (Haladi Kunku Programme) कार्यक्रम ठेवतात. तर नवीन लग्न झालेल्या महिला (Newly Married Woman) खास हलव्याचे दागिने घालून आपले पहिला हळदी कुंकू साजरा करतात. तर लहान बाळांना हलव्याचे दागिने घालून त्यांचे बोरन्हाण (Bornhan) केले जाते.

यंदा कोरोना व्हायरसमुळे योग्य ती काळजी घेऊन आपण घरी राहूनच छान घरच्या घरी हे हलव्याचे दागिने बनवू शकता. तसे बाजारातही हलव्याचे दागिने सहज उपलब्ध होतात. मात्र घरात राहून तुम्हाला हवे तसे तुम्ही छान हलव्याचे दागिने बनवू शकता.

लहान मुले आणि महिलांसाठी घरी बनवता येतील असे आकर्षक हलव्याचे दागिने

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख आणि पुजेची शुभ वेळ

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021 Special Recipes: यंदा मकर संक्रांतीला घरी बनवा तिळाच्या लाडूसह तिळपापडी, तिळवडी सारख्या झटपट रेसिपीज, Watch Videos

मग कसला विचार करताय? मकर संक्रांतीला अगदी काहीच दिवस उरले आहेत. मग आजचा सुट्टीचा दिवस साधून लागा जोरदार तयारीला....