Makar Sankranti Special Halwyache Dagine: मकर संक्रांत दिवशी हलव्याच्या दागिन्यांमधील मंगळसूत्र, नथ, बांगड्या घरच्या घरी कसे बनवाल?
हलव्याचे दागिने । Photo Credits: Instagram / salunkepratik

Halwyache Dagine Designs: मकरसंक्रातीचा (Makarsankranti) सण यंदा 2020 या नव्या वर्षात 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात मकरसंक्रांती दिवशी कुठे सुगड पूजन तर कुठे पतंगबाजीचा उत्साह असतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांत हा सण खास असतो. या दिवशी नव्या जोडप्याचे कौतुक केले जाते. सासरी सुन आणि जावयाचे लाड होतात. त्यांच्याप्रमाणेच नवजात बालकांनाही मकर संक्रांत दिवशी हलव्याचे दागिने घालून, सजवून तयार करतात. त्यांचे लाड पुरवले जातात. बालकांना बोरन्हान (Bornan) घालण्याची देखील प्रथा आहे. मग यंदा तुमच्याघरी देखील अशाचप्रकारे सण असेल तर घरच्या घरी आकर्षक हलव्याचे दागिने कसे बनवायचे यासाठी आम्ही तुम्हांला मदत करणार आहोत.Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

हलव्यापासून म्हणजेच फुटाण्यापासून मंगळसूत्र, नथ, चिंचपेटी, बांगड्या ते बाजूबंद बनवले जातात. महिला आणि पुरूष मकर संक्रांतीदिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हे हलव्याचे दागिने घालतात. घरातील वरिष्ठ मंडळी या दिवशी नवदांपत्यांचे औक्षण करतात. मग तुम्ही देखील या सणासाठी तयारी करत असाल तर घरच्या घरी असे बनवा हलव्याचे खास दागिने

हलव्याचे दागिने - नथ

हलव्याचे दागिने - बांगड्या

हलव्याचे दागिने - मंगळसूत्र

हलव्याचे दागिने - बाजुबंद

बोरन्हानासाठी दागिने 

मकर संंक्रांत निमित्त लहान मुलांसाठी बोरन्हाण केले जातं. त्यानिमित्ताने चिमुकल्यांना खास वेशभूषेमध्ये सजवलं जातं.  पूर्वीच्या काळी केवळ पारंपारिक दागिने हे हलव्यापासून बनवून त्याचे खास दागिने बनवले जात असे. मात्र आता जसा काळ बदलला तसा सण साजरा करण्याची पद्धतही बदलत आहे. नवे दागिने देखील आता हलव्याच्या दागिन्यामध्ये साकारले जात आहेत. मग तुमच्याकडे यंदा कोणते नवे हलव्याचे दागिने बनवले आहेत ते आमच्यासोबत देखील शेअर करा. तुम्हांंला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांंतीच्या शुभेच्छा!