Mahavir Jayanti 2021 Wishes: यावर्षी 25 एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान महावीरांचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महावीर स्वामींचा जन्म चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी झाला होता. त्यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम / कुंडलपूर या राज कुटुंबात झाला होता. त्यांना जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर मानले जाते. तपश्चर्याद्वारे ज्ञान प्राप्त झालेल्या 24 लोकांपैकी महावीर हे एक आहेत. भगवान महावीर यांनी आपल्या इंद्रिय व भावनांवर पूर्णपणे विजय मिळविला होता.
देशभरातील जैन मंदिरांमध्ये या दिवशी भगवान महावीरांची पूजा केली जाते. तसेच शोभा यात्रादेखील काढली जाते. या दिवशी जैन समाजातील लोक स्वामी महावीरांचा जन्म दिवस साजरा करतात. भगवान महावीरांनी जगाला सत्य, अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी जैन धर्माचे अहिंसा, सत्य, अपरीग्रह, अचौर्य (अस्थेय) आणि ब्रह्मचर्य हे पंचशील तत्वे सांगितले. महावीर जयंतीच्या दिवशी महावीरांची रथयात्रा काढली जाते आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची माहिती लोकांना दिली जाते. तसेच लोक या दिवशी एकमेकांना महावीर जयंती शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील महावीर जयंती निमित्त मराठमोळे Messages, Greetings, Whatsapp Status, Facebook Images शेअर करून जैन बांधवांना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा -Mahavir Jayanti 2020: महावीर जयंती का साजरी केली जाते? जैन संप्रदयाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांविषयी 'या' रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना जयंती निमित्त अभिवादन!
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस
जयंती निमित्त अभिवादन!
अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश
शिक्षकांचा धडा, संतांची संगत
अहिंसेचा प्रचार,
महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!
रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आत्म्या इतका मोठा
तुमचा कोणताही शत्रू नाही.
वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,
तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष
च्या रुपात आहेत.
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान महावीर यांना "वर्धमान" म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या आईचे नाव महाराणी त्रिशाला आणि वडिलांचे नाव महावीर महाराज सिद्धार्थ होते. महावीर स्वामींनी वयाच्या 30 व्या वर्षी ज्ञानाच्या शोधात घर सोडले. त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि दीक्षा घेतली. भगवान महावीरांनी तपश्चर्येनंतर कैवल्य ज्ञान प्राप्त केले आणि त्यानंतर त्यांना लोक तीर्थंकर म्हणू लागले.