
महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देण्यामध्ये ज्योतिबा फुले यांचा मोलाचा वाटा आहे. पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पुढे महिलांसाठी त्यांनाच शिक्षिका म्हणून पुढे आणणर्या जोतिबांची आज (11 एप्रिल) जयंती आहे. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक जोतिबांना आज जयंती (Mahatma Phule Jayanti ) दिनी अभिवादन करण्यासाठी लेटेस्टली मराठी कडून तयार करण्यातआलेली ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, संदेश, Quotes, WhatsApp Messages शेअर करत आजच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करायला विसरू नका.
जोतिबा फुलेंनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महिला आणि समाजात अस्पृश्य समजल्या जाणार्या वर्गाला फुलेंनी शिक्षण देऊन मुख्य प्रवाहामध्ये आणले. समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्ध फुलेंनी प्रखर लेखन देखील केले आहे. मग आजच्या दिवशी त्यांच्या कार्याचं स्मरण करत नक्की त्यांना मानवंदना अर्पण करा. Mahatma Phule Jayanti 2025: महात्मा फुले यांच्या जीवनावर दूरदर्शन प्रस्तूत 'भारत एक खोज' भाग-45 आपण पाहिलात का?
महात्मा जोतिबा फुले जयंती शुभेच्छा






महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाजाच्या स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली होती.