Maharashtra Krishi Diwas 2021: महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना Messages, WhatsApp Status,Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
Maharashtra Krishi Din (Photo Credits-File Image)

Maharashtra Krishi Diwas 2021: महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाइक यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करतात. खरंतर भारत हा एक कृषी प्रधान देश असून महाराष्ट्राला प्रमुख उत्पादक राज्यांपैकी एक मानले जाते. कारण उत्पादनासाठी देश या राज्यावर निर्भर आहे. तरी सुद्धा राज्याच्या अन्नदात्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कमी पाऊस, वाढती महागाई, पिकांचे नुकसान अशा सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कृषी दिन हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासह त्यांचे आभार मानण्यासाठी उत्तम दिवस आहे.

या खास दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचसोबत शेतकरी बांधवांचा सन्मान केला जातो. तर यंदाच्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!(Maharashtra Krishi Din 2021: महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या माहिती आणि इतिहास)

Maharashtra Krishi Din (Photo Credits-File Image)
Maharashtra Krishi Din (Photo Credits-File Image)
Maharashtra Krishi Din (Photo Credits-File Image)
Maharashtra Krishi Din (Photo Credits-File Image)

शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. काबाड कष्ट करणं हा त्याच्या नित्याचाचं दिनक्रम असतो. ऊन असो वा पाऊस बळीराजा मात्र, शेतीत राबत असतो. भारतात जवळपास 65 टक्के पेक्षा जास्त नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. वसंतराव नाईक यांचं कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.