Maharashtra Din Wishes in Marathi: 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या खास दिवसाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्यात दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2024) साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस या व्यतिरिक्त हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या गौरवशाली वारशाच्या प्रारंभाचे स्मरण करतो. या दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन नवीन राज्यांची निर्मिती झाली. बॉम्बे शहराबाबत दोन्ही राज्यांमध्ये मतभेद होते. मराठी लोकांचा असा विश्वास होता की मुंबईने त्यांच्यात सामील व्हावे कारण तेथील बहुसंख्य लोक मराठी बोलतात.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे तसेच वेगळ्या राज्याच्या लढ्याचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरात सार्वजनिक सुट्टी असते. ज्यामध्ये परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहण विधीसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील नागरिक एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Messages, Image, Quotes, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगल देशा, पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
नाजुक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा
हा श्री महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांनी एकत्र येऊन
महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
या दिवशी शिवाजी पार्क, दादर येथे मोठी मिरवणूक निघते. महाराष्ट्र राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. राज्याला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे ज्यामध्ये कला, साहित्यिक कामे, संगीत आणि अन्न यांचा समावेश आहे.