
भारतामध्ये भाषावार प्रांतरचनेचा निर्णय झाल्यानंतर मराठी भाषिकांसाठी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. 1 मे 1960 दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्त्वामध्ये आलं आणि तेव्हापासून 1 मे हा कामगार दिवसासोबतच राज्यात महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) म्हणून देखील साजरा करण्यास सुरूवात झाली. यंदा 63 वा महाराष्ट्र दिन आहे. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मराठी बांधवांना सहज मिळालेला नाही. यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. त्यामुळे शहिदांना आदरांजली अर्पण करत मराठी बांधव 1 मे हा महाराष्ट्र दिन साजारा करतात. मग प्रत्येक मराठी बांधवासाठी खास असलेल्या या दिवसाचा आनंद तुमच्या प्रियजणांसोबत, नातेवाईकांसोबत, आप्तेष्टांसोबत साजरा करण्यासाठी सोशल मिडीयात Facebook, WhatsApp Status, Messages, Wishes द्वारा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. मुख्यमंत्र्यांसह मान्यवर त्यांना शासकीय आदरांजली अर्पण करतात. मुंबई मध्ये हुतात्मा चौकामध्ये त्यांना आदरांजली अर्पण केली जाते. तसेच राज्यभर विविध शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहचवला जातो. नक्की वाचा: Maharashtra Day 2023 Rangoli Designs: महाराष्ट्र दिनानिमित्त काढता येतील अशा आकर्षक आणि सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ .
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कपाळी केशरी टिळा लावितो…
महाराष्ट्र देशा तुला वंदितो…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मंगल देशा, पवित्र देशा,महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा, हा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा !
63 व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रेसिडंसी मधून गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन राज्य बनवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच 1 मे दिवशी गुजरात राज्याच्या स्थापनेचा देखील दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये बोलीभाषा, खाद्यसंस्कृती ते वेशभूषेमध्येही मोठे वैविध्य आहे. ठराविक टप्प्यामध्ये त्यात होणारा बदल महाराष्ट्राला अधिकच खास बनवतो. देशाची आर्थिक राजधानी देखील मुंबई असल्याने देशाच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे.