Maharashtra Day 2023 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, हायटेक युगात द्या डिजिटल सदिच्छा

Maharashtra Day 2023: मराठी मुलूख आणि मराठी माणसाचा उर अभिनाने भरुन यावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). आजच्या दिवशी जगभरातील मराठी माणूस एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रावर प्रेम करणारे इतर भारतीयही एकमेकांना आपूलकीच्या नात्याने एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. म्हणूनच आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी आपण Maharashtra Day Wishes, Messages, HD Wallpapers, GIFs, Whatsapp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर करू शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपला संदेश समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. या दिवशी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अस्तापनांना सुट्टी असते. राज्यभरात आणि जगभरात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे त्या त्या ठिकाणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या स्थापनेची आणि महाराष्ट्राच्या हक्काचे शहर मुंबईला मिळण्याची कहाणीही तितकीच रोमांचक आहे. ज्यामुळे मरठी मनाची नाळ ही महाराष्ट्राशी जोडली गेली आहे. 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र (Maharashtra) हे स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. तेसुद्धा राजधानीच्या मुंबई शहरासह. हे होणे वाटते तितके सोपे नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवारहलाल नेहरु आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारताची भाषावर प्रांतरचना झाली. यात महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वास आले. मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची यावरुन प्रचंड संघर्ष झाला. दिल्लीतील कारस्थानी नेत्यांचा डाव हाणून पाडत मुंबईसह मराहाष्ट्र निर्मिती करण्यास मराठी मनाला यश आले. त्यासाठी सुमारे 105 मराठी बांधव हुतात्मे झाले. म्हणूनच या सर्व इतिहासाचे स्मरण आणि राज्याची स्थापना म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. (हेही वाचा, Happy Maharashtra Day 2023 Messages: महाराष्ट्र दिनानिमित्त Wishes, Greetings, Images, Quotes, SMS द्वारे द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!)

 

संपूर्ण राज्यात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो. या दिवशी, राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहास दर्शविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र सरकार देखील ध्वज फडकवते आणि या दिवसाच्या स्मरणार्थ अधिकृत समारंभ आयोजित करते.

महाराष्ट्र हा समृद्ध सांस्कृतिक वारसा, साहित्य, कला आणि संगीतासाठी ओळखला जातो. या राज्याने अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि विचारवंतांना जन्म दिला आहे. ज्यांनी देशाच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान दिले आहे. महाराष्ट्र दिन हा या यशाचा उत्सव साजरा करण्याचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा एक प्रसंग आहे.