Happy Maharashtra Day 2023 Messages: भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये एकसारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतातील अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. त्यामुळे भारतातील जवळजवळ सर्व राज्य आपला स्थापना दिवस मोठ्या उत्सवात साजरा करतात. महाराष्ट्रातही दरवर्षी 1 मे च्या दिवशी महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा केला जातो.
दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्रातील लोक राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि या राज्याला भारताचे राज्य म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला. या दिवशी या राज्याचे सरकार राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी देते. तसेच राज्यातील नागरिक या दिवशी एकमेकांना Wishes, Greetings, Images, Quotes, SMS द्वारे महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा देतात. तुम्हीही खालील मेसेज, ईमेज डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - May Day 2023: आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त WhatsApp Messages, HD Photos, Wishes द्वारे शेअर करा कामगार दिनाचे खास वॉलपेपर)
महाराष्ट्रातील माझ्या सर्व
बंधू आणि भगिनींना
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी…
मराठी बांधवांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कपाळी केशरी टिळा लावितो…
महाराष्ट्र देशा तुला वंदितो…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुतांश प्रांतीय राज्ये मुंबई प्रांतात जोडली गेली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी या भाषेच्या आधारे वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली. गुजराती भाषेतील लोकांना त्यांचे स्वतंत्र राज्य हवे होते. त्याचवेळी मराठी भाषा बोलणारे लोक स्वत:साठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करत होते. या काळात देशात अनेक आंदोलनेही झाली आणि या चळवळींचा परिणाम म्हणून 1960 साली मुंबई पुनर्रचना कायदा, 1960 अन्वये महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.