कृषिप्रधान भारतामध्ये सण साजरा करण्यामागे संस्कृती देखील जपली जाते.बेंदूर (Bendur) हा सण शेतकरी बांधवांसाठी खास असतो. या दिवशी शेतकर्याचा सखा बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम देऊन त्यांची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे बैल नाही असे लोक घरी मातीच्या बैलांची पूजा करतात.
बेंदूर हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक मध्येही साजरा केला जातो. मग या सणाच्या निमित्ताने बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी WhatsApp Messages, Status, Wishes, Quotes, HD Images च्या माध्यमातून देण्यासाठी लेटेस्टली कडून देण्यात आलेली शुभेच्छापत्र नक्की शेअर करू शकता. Maharashtra Bendur : काय आहे बेंदूर सण? जाणून घ्या महाराष्ट्रातील या अनोख्या सणाचं महत्व आणि वैशिष्ट .
महाराष्ट्र बेंदूर सणाच्या शुभेच्छा
बेंदूरच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने शेक देतात. नंतर बैलांना सजवतात, त्यांना रंग-रंगोटी करतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घालतात. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगरांच्या माळा घालतात. या दिवशी बैलांना गोडा-धोडाचा नैवैद्य दाखवला जातो. बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात घेऊन जातात. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. त्यानंतर गावातून बैलांची मिलारवून काढली जाते.