Maharashtra Bendur 2022 Wishes: महाराष्ट्र बेंदूर सणाच्या मराठी शुभेच्छा, WhatsApp Status, Messages, Quotes शेअर करून साजरी करा हा खास दिवस
Bendur-Wishes-2022

Maharashtra Bendur 2022 Wishes in Marathi: भारत कृषीप्रधान देश आणि शेतीप्रधान संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे बेंदूर होय. बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत सारखीच आहे फक्त दिवस वेगवेगळे आहेत.  मातीतुन सोनं पिकवण्यासाठी आणि उभ्या जगाचे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणजे बैल आहे. शेतात राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेदरम्यान बेंदूर साजरा केला जातो. शेतकरी सोबत बैल शेतात राबतो म्हणून आपण अन्न खातो, त्यांच्या विषयी  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही काही शुभेच्छा, व्हॉट्सअॅप, एसएमएस, इमेज घेऊन आलो आहोत, आदी माध्यमांतून शुभेच्छा घ्या आणि  बेंदूर सण उत्साहात साजरा करा. [हे देखील वाचा:- Bendur Bail Pola Sajawat: शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून, पायात घुंगरू, कशी केली जाते गाय-बैलांची सजावट, पाहा व्हिडीओ ]

प्राण्यांवर प्रेम करा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा, आपली संस्कृती आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवते आणि प्रत्येक प्राण्याचा आदर करायला शिकवते, दरम्यान, बेंदूरही उत्साहात साजरा करा आणि आपला सर्जा कत्तल खाण्यात मारणार नाही याचे तुमच्या बैलाला वचन द्या, बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा