Bendur Bail Pola Sajawat: शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘बेंदूर’ हा सण साजरा केला जातो. बेंदूर’च्या दिवशी गाय-बैलांना अंघोळ घातली जाते. शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून त्यांची सजावट केली जाते. गाय- बैल सजवण्याच्या प्रत्येकाच्या हटके पद्धती असतात. अनेक जण गाय- बैलांच्या अंगावर सुद्धा रंगरंगोटी करतात. पायात घुंगरू, गळ्यात माळा घातल्या जातात, सर्जाचा रुबाबदार रूप बेंदूर सणाच्या दिवशी उठून दिसते. पाहा कशी केली जाते, सर्जाची सजावट, पाहा व्हिडीओ [हे देखील वाचा:- Maharashtra Bendur 2022 Date: काय आहे बेंदूर सण? जाणून घ्या महाराष्ट्रातील या अनोख्या सणाचं महत्व आणि वैशिष्ट]
पाहा कशी केली जाते सजावट:-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)