
भारत हा कृषिप्रधान सण आहे. देशातील बहुतेक सण-उत्सव हे शेतीशी निगडीत असतात. असाच एक सण म्हणजे बेंदूर (Bendur), म्हणजेच बैल पोळा. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून, शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रीय बेंदूर (Maharashtra Bendur 2021) यंदा 22 जुलै रोजी हा सण साजरा केला जाईल. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून आराम देऊन त्यांची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे बैल नाही असे लोक घरी मातीच्या बैलांची पूजा करतात.
महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये बेंदूर साजरा होतो. या दिवशी बैलांचा मोठा थाट असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. या दिवशी त्यांना नदीवर नेऊन आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांच्या खांद्याला हळद व तुपाने शेक देतात. नंतर बैलांना सजवतात, त्यांना रंग-रंगोटी करतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घालतात. शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगरांच्या माळा घालतात. या दिवशी बैलांना गोदा-धोडाचा नैवैद्य दाखवला जातो. तर अशा या बेंदूर सणाच्या शुभेच्छा तुम्ही Wishes, Images, WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून देऊ शकता.






(हेही वाचा: महाराष्ट्रीय बेंदूर सणानिमित्त शुभेच्छांसाठी WhatsApp Status, Messages, and Facebook Photo इथून डाऊनलोड करा)
दरम्यान, बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर, तर उर्वरित महाराष्ट्रात बैल पोळा म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने सरकारने अशा मिरवणुकीवर प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे मागच्यावर्षी प्रमाणेच यंदाही बैलांची पूजा घरीच होणार आहे.