Magh Purnima 2019: 19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या माघ पौर्णिमेच्या व्रताची कथा जाणून घ्या (फोटो सौजन्य-फेसबुक)

Magh Purnima 2019:  माघ पौर्णिमा म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ महिन्यातील पौर्णिमा उद्या मंगळवारी 19 फेब्रुवारी रोजी असणार आहे. ब्रम्हपुराणात माघी पौर्णिमेचे महत्व असून या दिवशी भगवान विष्णु गंगेच्या पाण्यात त्यांच्या निवास करतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी गंगा नदीच्या पाण्यात स्नान केल्यास आयुष्यातीस सर्व पाप धुतली जातात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माघ पौर्णिमेच्या व्रताची कथा:

पौराणिक कथेनुसार, नर्मदा नदीच्या काठी शुभव्रत नावाचे विद्वान ब्राम्हण राहत होते. परंतु ते त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल खुप लालसा होती. तसेच कोणत्याही पद्धतीने धन संपन्न करण्याच्या लालसामध्ये वृद्धापकाळाच्या पूर्वीच त्यांना वृद्धत्व येऊ लागले होते. शुभव्रत यांना कालांतराने असे जाणवू लागले की, आपण पूर्ण आयुष्य फक्त धन कमवण्याच व्यतिथ केले आहे. त्यामुळे जीवनाचा उद्धार कसा होईल याची चिंता त्यांना सतावू लागली होती.

या स्थितीत शुभव्रत यांना माघ महिन्यात स्नान करण्यासंबंधित महत्व सांगणारा एक श्लोक आठवला. यानंतर स्नानाच्या संकल्प लक्षात ठेवून ब्राम्हण नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी ते तेथेच राहू लागले. आजाराने ग्रस्त आणि लागोपाठ 9 दिवस नर्मदा नदीत स्नान केले. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावल्या सारखी झाल्याने मृत्यूच्या दारावर येऊन आयुष्य ठेपले होते. मात्र शुभव्रत यांना आजवर आपण कोणतेच सत्कार्य केले नसल्याचे दुख जावणू लागल्याने आपल्याला नरकवास भोगावा लागणार असे वाटू लागले. परंतु माघ महिन्यात स्नान केल्याने शुभव्रत यांना मोक्षप्राप्ती झाली.(हेही वाचा-Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्ही पुढील पीढीला द्याल?)

पौर्णिमेची वेळ:

पौर्णिमा आरंभ- 18 फेब्रुवारी 2019, सोमवार रात्री 01.12 मिनिटांनी

पौर्णिमा समाप्त- 19 फेब्रुवारी 2019, मंगळवार 9.33 मिनिटांनी