
श आणि जगभरामध्ये गणपती बाप्पाचे असंख्य भक्त आपल्याला मिळतील. त्यामुळे हिंदू पंचागानुसार येणाऱ्या सर्व सर्व चतुर्थी ते बहुतांश वेळा साजरा करतात. माघ महिना या भक्तांसाठी महत्त्वाचा ठरतो. कारण या महिन्यात माघ विनायक चतुर्थी (Magh Vinayak Chaturthi) येते. ज्याला वरद चतुर्थी (Varad Chaturthi) असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी गणेश जयंती (Ganesh Jayanti) 25 जानेवारी 2023 रोजी साजरी होत आहे. या दिवशी भगवान शिव (Lord Shiva) आणि माता पार्वतीचा (Mother Parvati) पुत्र गणेशाची पूजा केली जाते.
असे मानले आणि सांगितले जाते की, गणेश जयंतीच्या दिवशी व्रत आणि पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी जो गणेशाची प्रेमाने पूजा करतो त्याला वर्षभर शुभ फळ मिळते.
माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

माघ विनायक चतुर्थी निमित्त शुभेच्छा!

सांगितले जाते की, गणपतीला प्रतीकात्मकदृष्ट्या विघ्नहर्ता - सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते. त्याला यश, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शिवपुराणानुसार, माता पार्वतीने एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात जीवन पवित्र केले, ज्यापासून भगवान गणेशाचा जन्म झाला. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थी तिथी होता. त्यामुळे दरवर्षी या तारखेला गणेश जयंती साजरी केली जाते.