
Lord Ram HD Images & Wallpapers: काही तासांत अयोध्येत (Ayodhya) राम जन्मभुमी मंदिराचे भूमीपूजन (Ram Janmbhumi Bhumi Pujan) पार पडले जाईल. आज दुपारी 12 वाजुन 15 मिनिटांनी हा भूमीपूजन कार्यक्रम सुरु होईल, पंंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांंच्या हस्ते राम मंंदिराची पहिली वीट रचली जाणार आहे. हे भूमिपूजन भव्य आणि ऐतिहासिक बनविण्यासाठी देशभरातील लोक उत्साहित आणि आनंदित आहेत. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सुमारे 176. पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि यातील बहुतेक लोक वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रमुख सामाजिक आणि राजकीय व्यक्ती आहेत. भूमीपूजन सोहळ्याच्या एक दिवस आधी अयोध्येत नियोजित राम मंदिराची रचना जाहीर करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख नेते यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम पूर्ण होईल. आपण देखील सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये असल्यास आपण या श्री रामाचे हे फोटो विनामूल्य डाउनलोड करू शकता. आम्ही श्री रामाचे फोटो आणि जीआयएफचा संग्रह घेऊन आलो आहोत जे आपण डाउनलोड करून सोशल मीडियावर शेअर करू शकता. (Ayodhya Ram Janmabhoomi Mandir Bhumi Pujan Live Streaming: 5 ऑगस्ट ला अयोध्येत होणार्या राम जन्मभुमी मंदिराचे भूमीपूजन कुठे पाहता येणार लाईव्ह?)
भूमिपूजनाचा हा दिवस महापर्व म्हणून साजरा केला जाईल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, इतर संस्था आणि सामान्य लोक या दिवशी केवळ दीप प्रज्वलितच करणार नाहीत, तर विविध मंदिरांमध्ये राम नावाचा जप करतील. अयोध्येतील राम मंदिर एका उभारलेल्या व्यासपीठावर भव्य तीन मजली मंदिर असेल. त्यात अनेक बुर्ज, खांब आणि घुमट असल्याचे म्हटले जात आहे. हे मंदिर 161 फूट उंच असेल आणि जे मूळ नियोजित होते त्यापेक्षा दुप्पट असेल. आज संपूर्ण देश उत्साही आहे आणि जर आपल्यालाला श्री राम, अयोध्या, अयोध्या राम मंदिरांचे फोटो शेअर करायचे असतील तर आपण या प्रतिमा विनामूल्य डाउनलोड करू शकता.

जय श्री राम

भगवान राम यांचे चित्र

धनुषसमवेत भगवान राम यांचे चित्र

भगवान राम उभे असलेले चित्र

असे म्हणतात की मंदिर बांधण्यास सुमारे तीन वर्षे लागतील परंतु भाविकांमध्ये उत्साही भावना अधिक आहेत. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणी सोहळ्यासाठी सर्वांगीण उत्साह आहे. 9 नोव्हेंबर, 2019 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने हिंदूं या जमिनीचे मालक असून तेथे मंदिर बांधण्याचे आदेश देऊन अयोध्या वाद संपविला.