
Laxmi Pooja 2024 HD Images: दीपावली हा सनातन संस्कृतीत प्रभू रामाशी संबंधित अतिशय पवित्र सण मानला जातो. दिवाळी (Diwali 2024) हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यंदा 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan 2024) करण्यात येणार आहे. या दिवशी सर्वत्र दिवे लावले जातात आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीची संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी म्हणून पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जातो. धार्मिक कथांनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचे आगमन झाले. तेव्हापासून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर येते आणि प्रदक्षिणा घालते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी यावी यासाठी लोक या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. तसेच या दिवशी लोक एकमेकांना लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छाही देतात. तुम्ही देखील लक्ष्मीपूजन निमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे तुमच्या प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. (Diwali 2024 Date, Laxmi Puja Muhurat: दिवाळी, लक्ष्मीपूजन तारीख, मुहूर्त आणि मुहूर्त व्यापार कधी? घ्या जाणून)





माता लक्ष्मी संपत्ती, शुभ, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. निसर्गातील सर्व शुभ घटक त्यांच्याशी निगडीत आहेत. 'लक्ष्मी' हा संस्कृत शब्द आहे. दिवाळीच्या दिवशी घरातील लहान मोठ्या व्यक्ती माता लक्ष्मीचे आशिर्वाद घेतात.