Last Sunset of 2020 (Photo Credit : ANI)

सर्वांच्याच धैर्याची परीक्षा घेणारे 2020 हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. या वर्षात कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ व त्यामुळे ओढवलेले संकट यामुळे लोकांना जेरीस आणले. आता 2021 चे स्वागत करायला संपूर्ण जग सज्ज झाले आहे. अशात सरत्या वर्षातील शेवटचे काही क्षण कॅमेरामध्ये टिपून ते अविस्मरणीय बनवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. अशाच एक सरत्या वर्षातील शेवटच्या सुर्यास्ताचा (Last sunset of 2020) फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील (Mumbai) माहीम बीचवरील (Mahim Beach) हा सुर्यास्ताचा फोटो आहे.

2020 वर आपल्या प्रकाशाची उधळण करीत हा सूर्य अस्ताला चालला आहे. क्षितिजाच्या ओढीने समुद्राच्या लाटांवर अलगद प्रवास करीत हा सूर्य 2020 चा निरोप घेत आहे. लालसर सूर्याचे मनोहर दृश्य या फोटोमध्ये दिसत आहे. आता उद्याची 2021 ची पहाट एक नवीन आशा घेऊन उदयास येईल ज्याचे स्वागत जगभरात आपापल्या पद्धतीने केले जाईल. 2020 ने लोकांची जगण्याची पद्धतच बदलून टाकली. अनेक प्रतिष्ठित लोकांच्या मृत्युपासून ते आर्थिक विवंचना अशा अनेक गोष्टी 2020 ने दाखवल्या. त्यामुळे येणारे 2021 हे वर्ष लोकांना सुखाचे, समृद्धीचे, आरोग्यदायी जावो अशीच प्रार्थना सर्वांच्या मनी आहे. (हेही वाचा: येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला खास मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा)

Last sunset of 2020: Visuals from Mahim Beach in Mumbai, Maharashtra. pic.twitter.com/z904OAqFSg

दरम्यान, जगात पहिल्यांदा सामोआ आणि ख्रिसमस आयलँड/किरीबातीमध्ये नवीन वर्षे उजाडले आहे. येथे नवीन वर्षाची सुरुवात 31 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता झाली. त्यानंतर न्यूझीलंड, रशिया आणि ऑस्ट्रेलियामधील काही भागांत नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. आशियाई देशांबद्दल बोलायचे तर, सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाचे स्वागत दक्षिण कोरिया, जपानमध्ये केले जाईल. जपान आणि दक्षिण कोरियामध्ये भारताच्या वेळेनुसार 31 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नवीन वर्ष सुरू होईल.