Lalbaghcha Raja Visarjan 2019 (Photo Credits: You Tube)

मुंबईमध्ये नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असणारा लालबागचा राजा आज पहाटे गिरगावच्या चौपटीवर पोहचला आहे. आता समुद्र किनार्‍यापासून आतमध्ये खास तराफ्याच्या सहाय्याने घेऊन जात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्त्यांनी भाविकांसोबत समुद्र किनार्‍यावर बाप्पाची शेवटची आरती केली आणि त्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशी दिवशी लालबागच्या राजाची मिरवणूक सकाळी 10 च्या सुमारास निघाली त्यानंतर सुमारे 21 तासांच्या मिरवणूकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे.

यंदा लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाचे 86 वे वर्ष होते. दहा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये भाविकांनीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यामध्ये सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीदेखील मोठी गर्दी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून बच्चन, अंबानी कुटुंबीय, दीपिका पदूकोण यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. मागील दहा दिवसांत लालबागच्या राजासाठी एन पावसातही दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र होतं. आणि तितक्याच भक्तीभावाने आज गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाला एका निनावी भक्ताने अर्पण केली सोन्याचा मुलामा असलेली पावलं

महाराष्ट्रातील पूर परिस्तितीचं भान ठेवत यंदा लालबागचा राजा मंडळासोबतच अनेकांनी आपली सामाजिक जबाबदारी सांभाळत सणाच्या खर्चाला कात्री लावत पूरग्रस्तांना मदत केली यामध्ये लालबागचा राजा मंडळाचादेखील समावेश आहे.