Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2019 (Photo credits: Lalbaugcha Raja / You Tube)

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या 11 दिवसांच्या सेवेनंतर आज (12 सप्टेंबर) लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. बुधवार रात्री भक्तांची रांग दर्शनाची रांग बंद झाली आहे. त्यामुळे आता लालबाग ते गिरगाव चौपटी अशा मुंबईच्या रस्त्यांवर लालबागचा राजा पाहण्यासाठी चौकाचौकामध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. सकाळी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडल्यानंतर लालबाग, परळ, दोन टाकी, कुंभारवाडा असं करत उद्या पहाटे गिरगावच्या चौपाटीवर पोहचणार आहे. त्यामुळे तुम्हांला हा विसर्जन सोहळा पहायचा असेल तर लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर त्याच्या विसर्जन सोहळ्याची झलक पाहता येणार आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवावर वरूणराजाचीदेखील कृपा राहिली मात्र या सार्‍या गोष्टींवर मात करून अनेक गणेशभक्त पाऊस पाण्यामध्येही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तासन तास रांगेत उभे राहिलेले दिसले. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनीदेखील यंदा लालबागच्या राजाला हजेरी लावली होती. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून, अनिल अंबानी आणि कुटुंबीय ते दीपिका पदुकोण अशा सेलिब्रिटींचा समावेश होता. Anant Chaturdashi 2019: गणेश विसर्जनासाठी बदलण्यात आले मुंबईतील वाहतूकीचे मार्ग, ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सादर केला नकाशा

मुंबईत लालबागच्या राजा 2019 विसर्जन सोहळ्याची क्षणचित्रं इथे पहा

Lalbaugcha Raja 2019 Live Darshan Online: लालबागच्या राजाचं घरबसल्या मोफत दर्शन घेण्यासाठी युट्युब, फेसबूक, ट्वीटर सह Android आणि iOS Mobile App च्या या लिंकवर क्लिक करा आणि यंदाचा गणेशोत्सव अधिक मंगलमय करा. गणेशभक्तांच्या गर्दीने फुललेल्या रस्त्यांमधून मार्ग काढत आज लालबागचा राजा विसर्जनासाठी पुढे सरकत आहे. यासाठी मुंबई पोलिस आणि प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रहदारीसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.