गौरी गणपतींचे आणि 7 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केल्यानंतर घरगुती गणपती असणारे लोक आता ब-यापैकी मोकळे झाले असतील. तसेच गावाला गेलेले चाकरमानीही परत मुंबईत आले असतील. त्यामुळे आता सर्वांना वेध लागले असतील लालबागच्या राजाच्या दर्शनाचे. कितीही पाऊस असला, कितीही उशीर झाला असला तरीही प्रत्येक गणेश भक्त लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. गणेश भक्त आपल्या व्यापात कितीही व्यस्त असला तरीही राजाला भेटण्याची आस असतेच. आपल्या लाडक्या राजाचे दर्शन घेता यावे, त्याला डोळे भरुन पाहता यावे म्हणून तासनतास रांगा लावून गणेश भक्त या लालबागच्या परिसरात पाहायला मिळेल. त्यात आता राजाच्या विसर्जनाला अवघे काही दिवस उरलेले असताना राजाच्या दर्शनासाठी लालबाग परिसरात भक्तजनांची एकच गर्दी पाहायला मिळेल.
यात गणेश भक्तांचा उत्साह जरी दांडगा असला तरीही सततच्या पावसामुळे भक्तजनांची लालबागच्या राजाला भेटण्याची इच्छा अपूर्ण राहता कामा नये म्हणून लालबागच्या राजाच्या मंडळाने ऑनलाईन माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घडवून देण्याची शक्कल लढविली आहे. यामध्ये फेसबूक, ट्वीटरसह युट्युब चॅनल आणि अधिकृत वेबसाईटवरही 24 तास लालबागच्या राजाचे दर्शन घेणं शक्य आहे. हेही वाचा- Ganesh Utsav 2019: मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळ लालबाग, चिंतामणी, गणेश गल्लीसह 'या' 5 ठिकाणी कसे जायचे? याची माहिती मिळवा
इथे पाहू शकता लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
लालबागच्या राजाचं लाईव्ह मुखदर्शन मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.दिवसातून दोन वेळेस लालबागच्या राजाची आरती होते. दुपारी12.30 आणि रात्री 8.30 वाजता बाप्पाची आरती होते. 11 सप्टेंबर 2019 रात्री 12 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं दर्शन रांगेमधून घेता येणार आहे.
आत्तापर्यंत बिग बी अमिताभ बच्चन, अंबनी परिवार, प्रसाद ओक, श्रेया बुगडे,अजिंक्य रहाणे, शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर यांच्या सोबतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील महाराष्ट्र दौर्यावर असताना मुंबईत गणेश चतुर्थी दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लालबागच्या राजाला सामान्यां इतकीच सेलिब्रिटींमध्येही क्रेझ आहे. अनेक दिग्गज मंडळी नित्यनियमाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.