Ardh Kumbh 2019 begins in Prayagraj (Image credits: PTI)

Kumbh Mela 2019: प्रयागराज (Prayagraj) येथे आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून मकर संक्रांतीनिमित्त (Makar Sankranti) पहिले शाही स्नान (Shahi Snan) पार पडले आहे. साधू-संतांसह अनेक भाविकांना शाही स्नान केले. आजच्या दिवशी गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्ती होते, अशी भाविकांची धारणा आहे. 13 आखाड्यात सर्व साधुसंतांनी मुहूर्तानुसार संगमात शाही स्नान केले. कुंभमेळ्यात 'या' दिवशी होणार शाही स्नान; जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व

यंदा कुंभमेळ्यात हायटेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. लोकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संगमावर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये 100 बेड आहेत. कुंभमेळ्यात 40000 एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत. कुंभमेळ्यात लेझर शो सह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

राजा हर्षवर्धन यांच्या राज्यात कुंभमेळ्याला सुरुवात झाली. राजा हर्षवर्धन 5 वर्षातून एकदा नद्यांच्या संगमावर मेळ्याचे आयोजन करत असे. या मेळ्यात धार्मिक कार्यक्रमांसह गरीब-धार्मिक लोकांना दान दिले जात असे.