अश्विन पौर्णिमेची रात्र भारतामध्ये कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा कोजागिरी 19 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्र देवाची पूजा केली जाते. कोजागिरीच्या दिवशी उपोषण, पूजन आणि जागरण या तीन गोष्टींना विशेष महत्त्व असतं. कोजागिरीच्या रात्री सर्वत्र दिवे लावले जातात. रात्र जागवाली जाते. मग अशा या मंगल दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना देऊन हा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी कोजागिरीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस, Wishes, HD Images, Greetings, Wallpapers, WhatsApp Status,Stickers फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. (Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागिरीच्या रात्री असे बनवा 'कोजागिरी स्पेशल मसाला दूध' जाणून घ्या सोपी रेसेपी).
कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून पृथ्वीवर येऊन 'को जागरती?' असा प्रश्न विचारते आणि जो जागा असेल तर त्याला वैभव प्राप्त करून देते अशी धारणा आहे. त्यामुळे या कोजागिरीच्या रात्री चंद्र प्रकाशाखाली चूलीवर दूध आटवून किंवा दूधाचे गोड पदार्थ बनवून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. ही रात्र थोडी धम्मालमस्तीची करण्यासाठी काही खेळ, गाणी यांचे आयोजन केले जाते. Kojagiri Purnima 2021 Date: येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्त्व.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
मंद प्रकाश चंद्र चांदण्यांचा
त्यात गोड स्वाद दूधाचा
मंगलप्रसंगी आज
विश्वास वाढू द्या नात्यांचा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शारदेचं चांदणं आज तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो
हीच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
प्रकाश चंद्र- चांदण्यांचा
आस्वाद मसालेदूधाचा
साजरा करू प्रियजणांसंगे
सण कोजागिरी पौर्णिमेचा
शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्राच्या साक्षीने मिळाली मसाले दुधाची मेजवानी
कोजागिरी रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
साधारण पणे कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही पावसाळ्यानंतर येणारी पहिली पौर्णिमेची रात्र असते त्यामुळे अनेकदा या रात्री आभाळ निरभ्र असते. अवकाशातील टिपुर्या चांदण्यांचा नजारा पाहता येतो. मग यंदाची कोजागिरीची रात्र तुम्ही कधी, कुठे कशी एंजॉय करताय हे आम्हांला कळवा आणि तुम्हांला आणि तुमच्या प्रियजणांना लेटेस्टली कडून कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !