अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2021) म्हणतात. काही लोक यास शरद पौर्णिमाही म्हणतात. यंदाच्या वर्षी शरद पोर्णिमा (Sharad Purnima) म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2021) 19 ऑक्टोबरला येते आहे. या दिवशी कोजागरी लक्ष्मी पूजा (Kojagari Laxami Puja) केली जाते. दिवाळी होणाऱ्या लक्ष्मीपूजनापूर्वी होणाऱ्या या लक्ष्मीपूजेस सुद्धा महत्त्व दिले जाते. पुरणात दिलेल्या माहितीनुसार, शरद पौर्णिमेदिवशी (Sharad Purnima 2021) लक्ष्मीमातेने अवतार धारण केला होता. या दिवशी लक्ष्मी माता रात्री उशीरापर्यंत पृथ्वीवर भ्रमण करते. अशा या खास दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा Greetings, Wallpapers, Wishes इमेज इथे देत आहोत. ज्या आपण मोफत डाऊनलोड करु शकता.
भारत हा एक विविधतेने नटलेला आणि समृद्ध परंपरा असलेला देश आहे. त्यामुळे इथे साजरे होणारे सण उत्सव हे सारखेच असले तरी ते साजरे करण्याची पद्धत, परंपरा आणि काही प्रमाणात दिवसही वेळ, काळ, स्थान आणि प्रदेश, समुहांनुसार वेगवेगळे असतात. अशी धारणा आहे की, कोजागिरी पौर्णिमेदिवशी मध्यरात्री निशिदकाळात पूजा केल्या लक्ष्मी देवी वरदान देते. (हेही वचा, Kojagiri Purnima 2021 Date: येत्या 19 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व)
मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या 16 कला पूर्ण करतो. या रात्री आकाशात अमृताचा वर्षाव होतो. याच रात्री लक्ष्मी रात्री उशीरपर्यंत पृथ्वीवर फिरत असते. ती आपल्या भक्तांना जाग्रती किंवा कोजागिरी असे विचारते. याचा अर्थ असा की, या रात्री कोण कोण जागे आहे. जे लोक लक्ष्मी देवीची पूजा मनोभावे करतात त्यांना लक्ष्मी वरदान देते असे म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी पीतळ, चांदी, तांबे किंवा सोन्याच्या लक्ष्मी देवीची प्रतिमा कपड्याने झाकून पूजा केली जाते. सकाळी देवीची पूजा केल्यानंतर रात्री चंद्रोदयानंतर पुन्हा एकदा ही पूजा पार पडते. या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत चांदिच्या ताटात खील बनवून आकाशात चंद्र निघताच आकाशाखाली ठेवले जाते. त्यानंतर देवीसमोर निरंजन लावले जाते. या वेळी देवीचे मंत्रही उच्चारले जातात.