Kiss Day (Photo Credits: YouTube and File Image)

फेब्रुवारी महिना हा ‘प्रेमाचा महिना’ म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात 14 तारखेला जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine's Day) साजरा केला जातो. अनेक प्रेमी युगुल या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. 7 तारखेला ‘रोज डे’ पासून या आठवड्याची सुरुवात होते व हा आठवडा 14 तारखेला ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी संपतो. या दरम्यान विविध दिवसांचे महत्व जाणून त्या नुसार हा आठवडला साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीकमधील सातवा दिवस म्हणजे ‘किस डे’ (Kiss Day). या दिवशी, प्रेमी एकमेकांना किस करून त्यांचे प्रेमाचे बंध आणखी मजबूत करतात. किस, चुंबन.. या गोष्टीला नात्यामध्ये खास महत्व आहे. आपले प्रेम, मनातील भावना व्यक्त करण्याची ही एक सुंदर पद्धत आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये ‘किस डे’ला विशेष महत्व आहे, कारण किस ही फार उत्कट भावना आहे जी आपल्या खास जोडीदारासोबतच अनुभवण्यात मजा असते. तर अशा या ‘किस डे’ला ‘किस’ सोबतच खास गिफ्ट देऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हा दिवस साजरा करू शकता.

विविध प्रकारचे किस – ‘किस डे’ला तुम्ही जोडीदाराला विविध प्रकारे किस करून तो दिवस खास बनवू शकता. लिप-लॉक, फ्रेंच किस, स्ट्राबेरी किस, टंग किस अशा अनेक किसच्या प्रकारांनी जोडीदाराला खुश करता येऊ शकते.

किस डे केक – अनेक कपल्स नात्यांमध्ये नेहमीच नवीन काहीतरी ट्राय करत असतात. ‘किस डे’ला तुम्ही जोडीदाराला एक छानसा केक गिफ्ट करू शकता. आता तुम्ही म्हणाल केक तर खूपच कॉमन गोष्ट आहे. मात्र याची मजा तेव्हा वाढेल जेव्हा तुम्ही दोघेही एकच केकचा तुकडा खात जवळ याल. दोन्ही पार्टनर एकच केकचा तुकडा खाण्याचा एकत्र प्रयत्न करतील आणि जेव्हा तो केक संपून तुमचे ओठ एकमेकांना भिडतील तेव्हाची मजा काही औरच असेल.

फोटो फ्रेम – ‘किस डे’ला एक खास किसवाली फोटो फ्रेम चांगले गिफ्ट ठरू शकेल. तर किसवाली फ्रेम म्हणजे ज्यामध्ये तुम्हा दोघांचा किस करतानाचा फोटो असेल. तर गरजेचे नाही की हा किस ओठावरीलच असला पाहिजे, गालावर किंवा कपाळावर किस करत असलेल्या फोटोची फ्रेमही तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

मोत्याचा दागिना – जवळजवळ प्रत्येक स्त्रीला दागिना आवडतो. त्यातल्या त्यात एखाद्या खास प्रसंगी घालण्यासाठी मोत्याचा नाजूकसा दागिना असेल तर ती स्त्री ताबडतोब खुश होते. त्यामुळे यंदाचा किस डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला छोटासा मोत्याचा दागिना गिष्ट करू शकता.

एकमेकांसोबत रोमँटिक क्षण व्यतीत करा – संपूर्ण व्हॅलेंटाईन वीकमध्ये ‘हग डे’ आणि ‘किस डे’ या दिवशी तुम्ही एकमेकांच्या शारीरिकदृष्ट्या जवळ येता. त्यातल्या त्यात किस ही फारच उत्कट भावना असल्याने ती तशीच एन्जॉय करणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवसाचे गिफ्ट म्हणून तुम्ही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण व्यतीत करू शकत. छानसा वॉक, आऊटींग, डिनर, घरी एकत्र कुकिंग, एकत्र टीव्ही पाहणे किंवा अगदी बेडरूममध्ये एकमेकांसोबत छानसा वेळ घालवू शकत. या सर्वांमध्ये पार्टनरला दिवसभर किस करत राहणे विसरू नका.  (हेही वाचा: Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!)

दरम्यान, व्हॅलेंटाईन विकमध्ये रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.