मकर संक्रांती (Photo Credits: Facebook)

Kinkrant 2023: देशभरात मकर संक्रांती (Makar Sankranti) चा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात (Kinkrant 2023) साजरी केली जाते. आज सर्वत्र किंक्रांत साजरी होत आहे. किंक्रांत का साजरी केली जाते यासंदर्भात अनेकांना माहिती नसते. आज आपण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत का साजरी केली जाते आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे? ते जाणून घेऊयात.

किंक्रात का साजरी केली जाते?

संक्रांतीदेवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून त्या राक्षच्या नावाने किंक्रांत म्हणून हा दिवस पाळला जातो. किंक्रांतीला करिदिन असंही म्हटलं जातं. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात.

किंक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य टाळावे -

किंक्रांतीचा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. मात्र, या दिवशी विवाहित स्त्रिया संक्रांतीप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात.

किंक्रांतीच्या दिवशी हे काम करू नये -

किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालणे अशुभ मानलं जातं. तसेच किंक्रांतीच्या दिवशी तीळ लावलेली शिळी भाकरी खाणं शुभ मानलं जातं. तसेच किंक्रातीला केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी. देशभरात किंक्रांतीच्या रुढी-परंपरा वेगवेगळ्या आहेत.