
'व्हॅलेनटाईन डे' संपल्यानंतर आता 'अॅन्टी व्हॅलेनटाईन डे' (Anti Valentine Day) साठी सुरुवात 15 फेब्रुवारी पासून झाली आहे. तर पहिल्या दिवशी स्लॅप डे नंतर आता आज (16 फेब्रुवारी) 'किक डे' (Kick Day)साजरा करण्यात येतो. आजचा दिवस महत्वाचा असून कारण किक डे निमित्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातून चुकीच्या व्यक्तींना दूर करण्याची संधी मिळते. बहुतांश वेळा तुमच्या आयुष्यातील काही व्यक्ती तुम्हाला चुकीच्या गोष्टींकडे नेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तुम्हाला नैराश्य आणि दुखी वाटते. एवढेच नाही काही रिलेशनशिप्समध्ये तुमचा सन्मान सुद्धा केला जात नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला एकटे वाटण्यापेक्षा आशा नात्यांपासून दूर राहिलेले बरे. त्यामुळेच किक डे ची संधी साधत तुम्ही वाईट गोष्टींसह चुकीच्या व्यक्तींना आयुष्यातून दूर करा.
असे म्हटले जाते की, आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी वाईट मार्गाने जाण्यापासून दूर रहावे. तसेच चुकीच्या सवयींपासून लांब होण्यासाठी आजचा किक डे महत्वपूर्ण आहे. कपल्सच्या नात्यात काही वेळे विश्वासघात केल्याने आपण त्याचे दुख बाळगतो. परंतु दुख बाळगणे ही गोष्ट वाईट आहेच पण वाईट व्यक्तींना सुद्धा आयुष्यात दूर करणे ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे. किक चा अर्थ मारणे असा सुद्धा होते. परंतु मारहाण करणे हा किक डे मागील उद्देश नाही आहे.(Anti-Valentine Week 2020 Calendar: स्लॅप डे ते ब्रेक अप डे अॅन्टी व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरे केले जातात हे 7 दिवस; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक)
किक डे साजरा करण्याचे विविध पर्याय आहेत. त्यानुसार तुम्ही चुकीच्या व्यक्तीला समोरासमोर भेटून नात्यामधील वाद संपवून दूर होण्याचा निर्णय सांगू शकता. परंतु एखादे नाते संपवण्यापूर्वी तुमची सुद्धा काय चुक आहे हे लक्षात घेत तुम्ही ही तुमच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.