श्री खंडोबा (Khandoba) हे महाराष्ट्राचे (Maharashtra) कुलदैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) खंडेरायांची उपासना केली जाते. खंडोबाचे नवरात्र (Khandoba Navratri) हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. याला षड्रात्रोत्सव असे म्हणतात. 24 नोव्हेंबरपासून या षड्रात्रोत्सवाला सुरुवात झाली असुन आज म्हणजेच चंपाषष्ठीला (Champa Shashthi) या उत्सवाची सांगता होणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टीला खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले, अशी आख्यायिका आहे. पाच दिवसांच्या उपासनेनंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज हा उपवास सोडायचा दिवस आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जागरात आज संपूर्ण जेजुरी नगरी दुमदुमुन उठते. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर गेले दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला नाही पण यावर्षी जेजूरी गडावर अगदी धुमधडाक्या चंपाषष्ठी साजरी होणार आहे
खंडेरायाची पुजा या सहा दिवसांत अगदी मनोभावाने केली जाते. या सहा दिवसांच्या नवरात्रात देवापुढे नंदादीप ठेवतात. खंडेरायास बेल, दवणा व झेंडूची वाहतात. खंडोबाच्या पूजेत भंडारा सर्वात महत्त्वाचा. भंडारा म्हणजे हळदीची पूड. भंडराऱ्या शिवाय खंडेरायाची पूजा अपूर्ण. खंडोबाच्या नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेचं आज चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण या खास पक्वानाचं नैवेद्य दिल्या जातं. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. (हे ही वाचा:- Happy Champa Shashti 2022 Images and HD Wallpapers for Free Download Online:खंडोबा नवरात्रोत्सव निमित्त शुभेच्छा देण्यासाठी Greetings आणि WhatsApp Messages)
चंपाषष्ठी म्हणजेच आज जेजूरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडेल. शारदीय आणि चैत्र नवरात्री प्रमाणेच या मल्हारी किंवा खंडोबा नवरात्री मध्येदेखील घटस्थापना कराण्याची, प्रत्येक दिवशी एक एक माळ वाढवण्याची प्रथा आहे. दरवर्षी हा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभवाने, भाविकांच्या जनसमुदयामध्ये साजरा केला जातो. "चंपाषष्ठी म्हणजे, त्रासापासून मुक्तीचा दिवस. आनंदाचा दिवस. चंपाषष्ठी यात्रेसाठी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत भाविकांची मोठी रांग लागते. घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी होतात.