Karwa Chauth 2020 | File Image

Karwa Chauth 2020 HD Images: कार्तिक कृष्ण चतुर्थी दिवशी करवा चौथ चे व्रत केले जाते. आज उत्तर भारतात या सणाची धूम पाहायला मिळेल, विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी आजच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी महिला सकाळी लवकर उठतात. स्नान करुन सुर्योद्यापूर्वी सरगीचे सेवन करतात. सरगीही सासूकडून पाठवण्यात येते. यात फळं, मिठाई, कपडे, आभूषण यांचा समावेश असतो. त्यानंतर दिवसभर पतीसाठी उपवास करतात आणि चंद्रदर्शनाने पतीच्या हातून पाण्याचा घोट घेऊन उपवास सोडतात. तुमच्या पतीराजांना करवा चौथ निमित्त शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, HD Images, शुभेच्छापत्रं सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याद्वारे शेअर करुन तुम्ही पतीदेवांना खुश करु शकता.

करवा चौथ निमित्त महिलांमध्ये नटण्या सजण्याचा उत्साह असतो. नवे कपडे, साजशृंगार, हातावर मेहंदी अशा पारंपारिक साजात विवाहित महिला तयार होते आणि पतीसाठी व्रत करते. साधारणपणे कुटुंबातील सर्व महिला एकत्रितपणे हे व्रत करतात. परंतु, कोविड-19 संकटामुळे फार गर्दी करणे, भेटीगाठी शक्य नसले तरी सणाचा उत्साह काही कमी झालेला नाही. (Karva Chauth 2020 Messages for Husband: करवा चौथ च्या शुभेच्छा Wishes, Greetings च्या माध्यमातून देऊन आपल्या पतिराजांना करा खूश!)

करवा चौथ शुभेच्छा!

सखी माथे की बिंदिया चमकती रहे

हाथों में चुड़ियां खनकती रहें

पैरों की पायल झनकती रहे

पिया संग प्रेम बेला सजती रहे

हैप्पी करवा चौथ!

Karwa Chauth 2020 | File Image

व्रत रखा है मैंने, बस एक प्यारी सी ख्वाहिश के साथ..

लंबी हो उम्र तुम्हारी, हर जन्म मिले हमें एक दूजे का सा

हैप्पी करवा चौथ!

Karwa Chauth 2020 | File Image

तुम मिले मुझे एक प्यार की तरह,

साथ तुम्हारा है संसार की तरह,

यूं ही बना रहे रिश्ता अपना,

खूबसूरत अहसास की तरह..

हैप्पी करवा चौथ!

Karwa Chauth 2020 | File Image

आजचा दिवस आहे तुमच्यासाठी

लवकर घरी या माझ्यासाठी

आतुरतेने वाट पाहत आहे तुमची

सफल होऊ दे करवा चौथची

पूजा आमची!

Karwa Chauth 2020 | File Image

सुवासिनी मागते चंद्राकडे मागणे,

जन्मोजन्मी हेच मिळावे पती

यासाठीच करवा चौथ चे व्रत करते

त्यांची सौभाग्यवती!

Karwa Chauth 2020 | File Image

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चर्तुर्थी दिवशी शिव-पार्वती आणि स्वामी कार्तिकेय यांच्यासमवेत चंद्रदेवतेची उपासना करतात. हिंदू परंपरेनुसार, पार्वतीने भगवान शंकरांना कठोर तपश्चर्या करून अखंड सौभाग्य प्राप्त केले. त्याच प्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत विवाहित महिला करतात.