Happy Karva Chauth 2020 Messages: तसे पाहायला गेले तर संकष्टी चतुर्थी दर महिन्यात येते. मात्र आश्विन महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी विशेष असते. कारण याच दिवशी देशभरात करवा चौथ (Karva Chauth 2020) हे व्रत केले जाते. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. त्यासाठी या दिवशी निर्जळी उपवास धरून रात्री चाळणीतून चंद्र पाहून आणि आपल्या पतीच्या हातातून जलप्राशन करुन हे व्रत सोडतात. आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत केले जाते. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) दरवर्षी प्रमाणे यंदा सवाष्णींनी एकत्रितरित्या जमून हा व्रताची कथा ऐकता येणार नाही. मात्र आपल्या एकमेकींना तसेच आपल्या पतीराजांना ग्रिटींग्स (Greetings), व्हॉटसअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून या व्रताचे छान शुभेच्छा संदेश नक्कीच पाठवता येतील.
त्यासाठी तुम्हाला छान मराठी आणि हिंदी मेसेजेस गरज असेल. अनेक स्त्रियांचा प्रेमविवाह असेल तर त्यांना देखील मराठीतील करवा चौथच्या शुभेच्छाची गरज भासेल. म्हणून अशा सर्वांसाठी खास मराठी आणि हिंदीतून करवा चौथचे शुभेच्छा संदेश
हेदेखील वाचा- Karwa Chauth 2020 Mehndi Design : करवा चौथ ला आपल्या हाता-पायांवर काढा या सुंदर आणि आकर्षक मेहंदी डिजाइन
या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करुन उपास सोडण्याचा नियम आहे. या दिवशी धारदार वस्तूंपासून लांब राहावे. स्त्रियांनी या दिवशी पांढर्या वस्तू दान करुन नये. तसेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नये असे थोरा-मोठ्यांकडून सांगण्यात येते. या दिवशी सवाष्णी लाल रंगाची साडी वा जोडा परिधान करुन चंद्रदेवाची पूजा करतात. अशा या पावित्र्यमय सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!