Kartiki Ekadashi 2023 Marathi Abhang: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी ही कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2023) किंवा देवउठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीसह चातुर्मास समाप्त होतो आणि आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले देव जागे होतात असे मानले जाते. याच दिवसापासून सर्व प्रकारच्या शुभ कार्यांचीही सुरुवात होते. यंदा गुरुवार म्हणजेच 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे.
दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठा उत्सव साजरा होतो. यंदाही सोहळ्यासाठी पंढरी सज्ज झाली असून, लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी शहरात दाखल झाले आहेत. 23 नोव्हेंबर पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल पूजा केली जाणार आहे.
वर्षभरात एकवीस एकादशी असतात त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व असते. या दोन महाएकादशी म्हणून ओळखल्या जातात. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. अनेक वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पायी वारी करतात. विठ्ठलाच्या नावाचा गजर आणि त्याला टाळ, मृदुंगाची साथ अशा भक्तीमय वातावरणात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. म्हणूनच या मंगलमय प्रसंगी विठ्ठलाचे काही खास अभंग ऐकून तुम्हीदेखील भक्तिभावाने ही एकादशी साजरी करू शकता.
पाहूया भक्तीगीते व अभंगांचे व्हिडीओ-
दरम्यान, 23 नोव्हेंबरला एकादशी झाल्यानंतर 24 नोव्हेंबर पासून तुळशी विवाहारंभ होत आहे. प्रबोधिनी एकादशी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11.03 वाजता सुरू होईल आणि 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9.01 वाजता समाप्त होईल. त्यामुळे गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत केले जाईल.