Kartiki Ekadashi 2023 Wishes in Marathi: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत साजरी करा प्रबोधिनी एकादशी

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा तुमच्या विठूभक्तांना WhatsApp Wishes, Facebook Messages, Quotes द्वारा देत शेअर करत साजरा करा आजचा मंगलमय दिवस!

Kartiki Ekadashi 2023 Wishes in Marathi: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा शेअर करत साजरी करा प्रबोधिनी एकादशी
कार्तिकी एकादशी । File Image

Kartiki Ekadashi 2023 Wishes in Marathi: महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी प्रमाणे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आषाढी एकादशी पासून सुरू झालेला चातुर्मास (Chaturmas) कार्तिकी एकादशीला संपतो. यंदा ही कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकर्‍यांचा पुन्हा मेळा रंगतो. विठूनामाचा गजर करत सारे पंढरपूरात दाखल होतात. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्र मंडळींना द्यायच्या असतील तर Wishes, Messages, Greetings, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.  कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी; सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे.

कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी सारे भक्त आसुसलेले असतात. ज्यांना कार्तिकीला पंढरपूरात जाणं शक्य नसतं ते भाविक जवळच्या विठ्ठल- रूक्मिणीच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतात. या दिवशी काही जण एकदिवसीय व्रत करतात. कार्तिकी एकादशी नंतर द्वादशीपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते. हिंदुधर्मीयांसाठी या दिवसापासून लगीनसराई सुरू होते.

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा (Kartiki Ekadashi Wishes in Marathi)

कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image
कार्तिकी एकादशी । File Image

कार्तिकी एकादशी ही देव उठनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी विष्णू भगवान निद्रावस्थेमधून जागे होतात आणि पुन्हा कामाला सुरूवात करतात अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2023 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).