हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी 24 एकादशी असतात, त्य्तही वर्षातून दोन महाएकादशी असतात. पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi 2022). कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) म्हणून ओळखले जाते. यंदा 4 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.
या चार महिन्यात कोणतीही मंगलकार्ये होत नाहीत. प्रबोधिनी एकादशीपासून मंगल कार्यांना सुरुवात होते. तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून आणि याच दिवसापासून लग्नसराईचे दिवस सुरु होतात. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.
तर या खास दिवशी मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून प्रियजन व नातेवाईकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, कार्तिक शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील लोक उपवास करतात. कार्तिकी एकादशी हे संप्रदायाच्या मर्यादा लांघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत आहे. या दिवशी श्रीविष्णूला बेल आणि शिवाला तुळस वाहता येते. या दिवशी पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे असे सांगितले आहे. या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानतात.