कार्तिक शुद्ध एकादशी (Kartiki Ekadashi 2021) ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते.ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.कार्तिक शुद्ध एकादशी!!! तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात.
यंदा कार्तिकी एकादशी 14 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.या दिवशी विठ्ठल भक्तांसोबत तुम्ही हे शुभेच्छापत्र शेअर करून त्यांचाही आनंद द्विगुणित करायला विसरू नका. चला तर पाहुयात कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा देणारे ही काही फ्री टू डाउनलोड शुभेच्छापत्रे.