Kartiki Ekadashi 2020 Wishes In Marathi: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा देत खास करा विठू भक्तांंचा आजचा दिवस
Kartiki Ekadashi

Kartiki Ekadashi 2020 Wishes and Messages In Marathi: महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीनंतर (Ashadhi Ekadashi) चार महिन्यांनंतर येणार्‍या कार्तिकी एकादशीचा (Kartiki Ekadashi) मोठा उत्सव असतो. यंदा महाराष्ट्रात कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. ही एकादशी प्रबोधिनी एकादशी (Prabodhini Ekadashi) किंवा देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) म्हणून देखील ओळखली जाते. पंढरपुरात वारकर्‍यांसोबतच सर्वत्र देशभर हिंदू बांधव हा कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा कोरोना वायरसचं सावट कार्तिकी एकादशीवरदेखील आहे. त्यामुळे तुम्हांला विठूराया-रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडून एकमेकांना कार्तिकी एकादशी निमित्त भेटता येणार नसले तरीही सोशल मीडीयाच्या माध्यमातून कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा एकमेकांना देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. कार्तिकी एकादशी निमित्त प्रबोधिनी एकादशी, देव उठनी एकादशीच्या शुभेच्छा मराठी संदेश, कार्तिकी एकादशी स्टेट्स, फेसबूक मेसेजेस,Wishes, GIFs, WhatsApp Stickers च्या माध्यमातून देऊ शकता. Kartiki Ekadashi 2020 Messages in Marathi: कार्तिकी एकादशी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन मंगलमय करा दिवस!

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मागील 4 महिन्यांत चातुर्मासाचं पाळलेलं व्रत देखील समाप्त होते. विठू माऊलीचे भक्त कार्तिकी एकादशीच्या दिवशी दिवसभर व्रत, उपवास करून विठ्ठल-रुक्मिणीची आराधना करतात.

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

माझ्या जीवीचे जीवन

माझ्या विठ्ठलाचे निधान

उभा असा विटेवरी

वाटे प्रेमाची शिदोरी

कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

Kartiki Ekadashi Wishes (Photo Credits: File Image)

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने

कार्तिकी एकादशी निमित्त

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

मनःपूर्वक शुभेच्छा

Kartiki Ekadashi Wishes (Photo Credits: File Image)

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

[caption id="attachment_76397" align="alignnone" width="1200"] Kartiki Ekadashi Wishes | Photo Credits: File Image

पंढरीची वारी जयाचिये कुळी

त्याची पायधुळी लागो मजकार्तिकी एकादशी

विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Kartiki Ekadashi | File Image

भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत असे 4 महिने निद्रावस्थेमध्ये असतात. कार्तिकीला ते पुन्हा जागे होतात म्हणून कार्तिकी एकादशी देव उठनी एकादशी म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच पुन्हा मंगलकार्यांना सुरूवात होत असल्याने हिंदू धर्मियांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण असते. ही कार्तिकी एकादशी तुमच्या देखील आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, समाधान घेऊन येवो हीच कामना करत लेटेस्टली मराठीकडून देखील प्रबोधिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!