Kano Jigoro Google Doodle: कानो जिगोरो यांची 161 वी जयंती साजरी करत गुगलने साकारले डूडल
Kano Jigoro Google Doodle | (PC: Google )

प्रोफेसर कानो जिगोरो यांचे गूगल डूडल (Kano Jigoro Google Doodle) साकारत जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने आदरांजली अर्पण केली आहे. कानो जिगरो हे 'मार्शल आर्ट'चे माष्टर होते. त्यांना “फादर ऑफ ज्युडो” (Father of Judo) नावानेही ओळखले जाते. एके काळी मार्शल आर्ट हा मारामारीचा खेळ म्हणून ओळखला जात असे. कानो जिगोरो यांनी या खेळाला न्याय, सौजन्य, सुरक्षा आणि नम्रता आदी गोष्टींसाठी नागरिकांना एकत्र आणणारा खेळ म्हणू औपचारीक मान्यता मिळवून दिली. गूगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रोफेसर जिगोरो यांची १६१ वी जयंती साजरी करण्यासाठी लॉस एंजेलिस ( Los Angeles) मधील कलाकार सिंथिया युआन चेंग (Cynthia Yuan Cheng) यांनी डूडलसाठी खास चित्रण केले आहे.

कानो जिगरो यांच्या जयंतीनिमित्त गूगलने आपल्या डूडलमध्ये अनेक स्लाईड्सचा वापर केला आहे. ज्यात कानो जिगरो आणि त्यांच्या मूव्हचा समावेश आहे. ज्युडो खेळतानाचे लोकांची काही चित्रेही बनविण्यात आली आहेत.काही चित्रांमध्ये कानो जिगरो आपल्या विद्यार्थ्यांना मार्शल आर्टचे धडे देताना दिसत आहेत. इथे पाहा Kano Jigoro Google Doodle सर्व प्रतिमा. (हेही वाचा, Michiyo Tsujimura Google Doodle: मिचिओ त्सुजिमुरा, Green Tea Researcher यांना 133 व्या जयंती निमित्त गूगल चं खास डूडल)

जिगोरो यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1860 मध्ये जपानच्या मिकागे (Mikage - आता कोबेचा भाग) येथे झाला. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांच्या वडिलांसोबत ते टोकियोला गेले. तेथे त्यांनी शालेय शिक्षणासाठी शाळेत प्रवेश घेतला. शाळेत एक लहान मूल म्हणून त्यांना ओळखले जात असले तरी, त्यांना अनेकदा संकटांचा सामना करावा लागला. त्यामुंळे त्यांनी सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जुजुत्सू मास्टर आणि माजी सामुराई फुकुडा हाचिनोसुके (Jujutsu master and former samurai Fukuda Hachinosuke) यांच्याकडे मार्शल आर्टचे धडे गिरवले. पुढे त्यांनी 1882 मध्ये जपानमध्ये आधुनिक मार्शल आर्टची स्थापना केली. त्यांनी 1879 मध्ये संयुक्त राष्ट्रचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल ग्रांट यांच्या सन्मानार्थ आपल्या प्रशिक्षकांसोबत जुजित्सु (जुडो) स्पर्धेत भाग घेतला. 1911 मध्ये जुडोला जपानच्या शैक्षणिक प्रणालीत अधिकृत रुपात स्वीकारले गेले. त्यानंतर 1964 मध्ये जुडो हा ऑलिम्पीक स्पर्धेचा एक भाग बनला.