गूगल (Google) कडून आज मिचिओ त्सुजिमुरा (Michiyo Tsujimura) या जॅपनीज अॅग्रिकल्चर सायंटिस्टला डूडल द्वारा मानवंदना देण्यात आली आहे. आज Michiyo Tsujimura यांची 133 वी जयंती आहे. Michiyo Tsujimura या पहिला जपानी महिला आहेत ज्यांनी कृषीक्षेत्रामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे. Michiyo Tsujimura यांनी ग्रीन टी (Green Tea) आणि त्याचे आरोग्याला फायदे या विषयावर सखोल काम केले आहे.
Michiyo Tsujimura यांचा जन्म 1988 साली Saitama च्या Okegawa मध्ये झाला. सुरूवातीला त्यांनी Hokkaido Imperial University मध्ये अनपेड लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरूवात केली. Tsujimura यांच्यासाठी हे आव्हान होतं कारण त्यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये महिलांना प्रवेश देखील नव्हता. काही वर्षांनी त्या Tokyo Imperial University मध्ये आल्या आणि ग्रीन टी वरील बायो केमेस्ट्री वर अभ्यास करण्यास सुरूवात केली. Dr Umetaro Suzuki ज्यांनी vitamin B1 चा शोध लावला त्यांच्यासोबतही Tsujimura यांना काम करण्याची संधी मिळाली. या दोघांनी केलेल्या संशोधनातून ग्रीन टी मध्ये vitamin C चा देखील समावेश आहे हे संशोधन समोर आणलं. (नक्की वाचा: ही आहे ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ, जाणून घ्या सविस्तर).
1949 साली Tsujimura यांनी एज्युकेटर म्हणून इतिहास रचला. त्यांनी अनेक वर्ष University professor म्हणून काम केले. Tokyo Women's Higher Normal School मध्ये 1950 पासून काम करण्यास सुरूवात केली. पुढे पहिल्या dean of the Faculty of Home Economics म्हणून त्यांना गौरवण्यात आले. 1956 मध्ये Japan Prize of Agricultural Science देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 1968 साली Order of the Precious Crown of the Fourth Class देण्यात आला.
Michiyo Tsujimura यांचं निधन वयाच्या 81 व्या वर्षी 1969 साली झाला.