January 2020 Festivals, Events and Holiday Calendar: मकर संक्रांती, प्रजासत्ताक दिन, गणेश जयंती सहित 'हे' आहेत जानेवारी महिन्यातील खास दिवस; जाणून घ्या तारीख, वार
जानेवारी 2020 (Photo Credits: Pixabay)

नवीन वर्षाची सुरुवात आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जानेवारी पासून नवे वर्ष आरंभले जाते. वर्षाचा पहिला महिना हा निश्चितच प्रत्येकासाठी खास असतो. असं म्हणतात, की भारतीयांच्या वर्षातील 365 दिवसांपैकी अर्ध्याहून अधिक दिवस हे सण उत्सावाचे असतात. मग हा पहिला महिना सुद्धा याला अपवाद कसा असेल? जानेवारी 2020 च्या कॅलेन्डर नुसार येत्या महिन्यात काही खास दिवस असणार आहेत. यामध्ये मकरसंक्रांती (Makar Sankranti) , प्रजासत्ताक दिवस (Republic Day) , गणेश जयंती (Ganesh Jayanti), पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi), षटतिला एकादशी (Shattila Ekadashi) याचा समावेश आहे. या दिवसांचे वार आणि तारीख यांच्यासहित सविस्तर यादी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जणूं घेऊयात जानेवारी 2020 मधील महत्वाचे सण आणि उत्सव कधी असणार?

Festival Calendar 2020: मकरसंक्रांत, गणेश चतुर्थी, दिवाळी हे सण नव्या वर्षात पहा कधी येणार?

जानेवारी 2020 सणाची यादी

- 2 जानेवारी गुरु गोविंद सिंह यांची जयंती

- नववर्षाची सुरुवात यंदा पुत्रदा एकादशीपासून होणार आहे. 6  जानेवारी रोजी ही एकादशी असणार आहे.

- 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकांनद यांची जयंती असणार आहे. हा दिवस युवा दिन म्ह्णून साजरा केला जातो.

-नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही 13 जानेवारी रोजी असणार आहे.

- दरवर्षी 14 जानेवारीला येणारा मकरसंक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी रोजी असणार आहे. यंदाचे वर्ष हे लीप इयर असल्याने हा दिवस पुढे आला आहे. याच दिवशी पंजाबी बांधवांचा लोहरी हा सण तसेच दाक्षिणात्य भागात पोंगल साजरी होणार आहे. हा सार्वत्रिक सुट्टीचा दिवस असेल.

-जानेवारी महिन्यताच दुसरी महत्वाची एकादशी म्हणजेच षटतिला एकादशी 20 जानेवारी रोजी असणार आहे.

- 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस यांची जयंती

- यंदा 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस हा रविवारी असणार आहे, यामुळे सुट्टीच्या अपेक्षेत असणाऱ्या मंडळींची थोडी निराशा होऊ शकते.

- 28 जानेवारी रोजी श्रीगणेश जयंतीचा मुहूर्त आहे.

- 29जानेवारी रोजी वसंत पंचमी आहे.

- 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहिद दिन पाळला जातो.

January 2020 Festivals:मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, गणेश जयंती, ’हे' आहेत जानेवारी महिन्यातील खास दिवस  Watch Video 

याशिवाय जानेवारी महिन्यात काही खास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस देखील साजरे केली जातील. यामध्ये जागतिक कुटुंब दिन (1 जानेवारी), जागतिक ब्रेल दिन ( 4 जानेवारी), राष्ट्रीय पक्षी दिन आणि राष्ट्रीय केटो दिन (5  जानेवारी) या दिवसांचा समावेश आहे.