Youth Day | File Image

आंतरराष्ट्रीय युवा दिवस (International Youth Day) हा 12 ऑगस्ट दिवशी साजरा केला जातो. UN कडून पहिल्यांदा 2000 साली त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. जगभरात तरूणाईला सामोरं जावं लागणार्‍या सांस्कृतिक आणि कायदेशीर गोष्टींकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने तरूणाईला सामोरे जावे लागणार्‍या अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा दिवस आहे. जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने तुमच्या मित्रमंडळींना, तरूण दोस्तांना या दिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडीयात Facebook, WhatsApp च्या माध्यमातून आज जागतिक युवा दिनाच्या शुभेच्छा शेअर करायला विसरू नका.

तरूण मंडळी ही देशाचं भवितव्य असतात. त्यामुळे तरूणाई कोणत्या दिशेने प्रवास करत आहे यावरच देशाचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे तरूण मंडळींकडे दुर्लक्ष करू नका. "Transforming Food Systems: Youth Innovation for Human and Planetary Health." या थीम वर यंदा जागतिक युवा दिवस साजरा केला जात आहे. तरूणाईला आजच्या दिवशी प्रेरित करण्यासाठी जगभरातील मान्यवरांचे काही Quotes, विचार शेअर करत ते करत असलेल्या कामामध्ये तुम्ही त्यांना प्रेरणा देऊ शकता.

जागतिक युवा दिन 2021 Quotes

Youth Day | File Image
Youth Day | File Image
Youth Day | File Image
Youth Day | File Image
Youth Day | File Image
Youth Day | File Image
Youth Day | File Image

तरूण पिढी ही देशाची शक्ती असते त्यामुळे तरूणाई जितकी सशक्त तितका देशाचा विकास अधिक जोमाने होऊ शकतो. तरूण पिढी देशाचा कणा असल्याने त्यांच्या गरजांकडे, मनोधैर्य वाढवण्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचे आहे. त्यांच्या विकासामध्ये, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळणं गरजेचे आहे. आजच्या युथ डे च्या निमित्ताने हेच जाणून पुढच्या पिढीपर्यंत हे प्रेरणादायी विचार नक्की पोहचवा.