International Yoga Day 2022 Messages: लोकांना योगाची जाणीव व्हावी यासाठी जगभरात दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन (Yoga Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानंतर 2015 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योग दिनाच्या निमित्ताने योगाचं महत्त्व सर्वांना सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
योगामुळे तुम्ही निरोगी राहू शकता, तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग खूप उपयुक्त आहे. योग दिनानिमित्त, तुम्ही फोटो, एसएमएसद्वारे आपल्या मित्र-परिवारास तसेच योगप्रेमींना खास मराठी संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Yoga Poses to Cure Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' 5 योगासन, Watch Video)
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे,
समाधान सर्वात मोठी संपत्ती आहे,
हे केवळ योगाद्वारेच मिळते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते.
धन, प्रसिध्दी आणि मन शांती.
धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतो
परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते.
योग दिनाच्या शुभेच्छा…!
योग आपल्याला निसर्गाजवळ नेतो
योग आपल्याला ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल
तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे.
म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वरील ईमज पाठवून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास योग दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामुळे त्यांना योग करण्यास नक्की प्रेरणा मिळेल.