
International Yoga Day 2020 Images: आपल्या जीवनात योगाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. दरवर्षी 21 जून हा दिवस 'जागतिक योगा दिन' (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज सर्वत्र हा दिवस उत्सहात साजरा होत आहे. उत्तर गोलार्धामध्ये असणार्या भागात 21 जून हा दिवस सगळ्यात मोठा दिवस आहे. या दिवशी वर्षभरात सूर्य पहाटे सर्वात लवकर उगवतो, तर संध्याकाळी उशिरा सुर्यास्त असतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य राखून जगभरात 'निरोगी आरोग्या'साठी योग दिन साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत योग दिन साजरा करण्याबाबत एक प्रस्ताव मांडला होता. 2015 मध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी175 देशांच्या सहप्रतिनिधींच्या संमतीने योग दिन सेलिब्रेशनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे 2015 पासून 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्यात येत आहे. 'जागतिक योग दिन' निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी खालील शुभेच्छापत्र तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Good Habits: व्यायाम करा! प्रतिवर्षी 40 लाख लोक वेळेआधी मृत्यू होण्यापासून वाचतात- सर्वे)






योगा हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. आपल्या आयुष्यात व्यायाम आणि योगाचे अतिशय महत्त्व आहे. दररोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर होतो. तसेच हाडं, मांसपेशी आणि सांधे दणकट राहातात. योग केल्याने आपल्या शरीराला नवी ऊर्जा मिळते. योग आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवतो. योगशास्त्राचा उगम हा सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये झाला आहे. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी 'योग' करणं अत्यंत आवश्यक आहे.