World Music Day 2021 Positive Marathi Songs: जागतिक संगीत दिनानिमित्त 'ही' काही प्रेरणादायी गाणी ऐकून आयुष्यात एकमेकांना द्या आधार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits Pixabay)

World Music Day 2021 Positive Marathi Songs: भारतीय धर्म शास्रानुसार संगीताचा चमत्कार हा सृष्टिच्या निर्माण होण्याच्या वेळेसच दिसून आला होता. भगवान ब्रम्ह यांनी सृष्टिची निर्मितीचे कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांना असे जाणवले की, काहीतरी अपूर्ण आहे. तेव्हा भगवान विष्णु यांनी असे म्हटले, आपल्या कमंडलातील काही पाण्याचे थेंब पृथ्वीवर टाकावे. ब्रम्हा यांनी असे केल्यानंतर हातात वीणा घेतलेल्या माता सरस्वतीने आपले रुप प्रकट केले. तर सरस्वती हिने जेव्हा आपल्याकडे असलेल्या वीणेच्या तारा छेडल्या तेव्हा पृथ्वीतलावर सजीवपणा असल्याचे जाणवले. झराच्या पाण्याचा झुळझुळ आवाज, कोकिळेचे मधुर गाणे, पानांची सळसळाट जणू सृष्टि जीवंत झाल्यासारखी वाटली. अशाच प्रकारे जागतिक संगीत दिवसाचे भारताशी असलेले नाते अधिक गहरे असल्याचे मानले जाते. संगीताच्या विविध पैलूंमुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय संगीत दिन म्हणून साजरा केला जातो.

संगीत ऐकल्यामुळे आपल्या मनाला जशी शांती मिळते त्याच प्रमाणे एखादे प्रेरणा देणारे गाणे तुम्ही कधी निराश असल्यास ऐकले आहे का? खरंच आपल्याला कोणती तरी आधार देतेय असे गाण्याच्या स्वरातून काही वेळासाठी भासते. तर यंदाच्या जागतिक संगीत दिनानिमित्त 'ही' काही प्रेरणादायी गाणी ऐकून आयुष्यात एकमेकांना द्या आधार.(Happy Music Day 2021 Messages in Marathi : जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे Greetings, Wishes, WhatsApp Status, Quotes , Facebook Image आणि दया संगीतमय शुभेच्छा)

तुम्ही ही आजचा दिवस तुमच्या आवडत्या गाण्यांसोबत सेलिब्रेट करा. तुमच्या आवडत्या लोकांबरोबर तुमची आवडती गाणी ऐकून हा दिवस साजरा करा.