International Men’s Day 2019: स्त्री आणि पुरूष ही आयुष्यरूपी गाडीची दोन चक्र आहेत. त्यामुळे कोणत्याही कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये त्या दोघांचाही समतोल राखणं गरजेचे आहे. जसा 8 मार्च जागतिक माहिला दिन साजरा केला जातो तसाच 19 नोव्हेंबर दिवशी जागतिक पुरूष दिन (International Men’s Day) साजरा केला जातो. यंदा हा पुरूष दिन मंगळवारी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील पुरूषांसाठी यंदाचा जागतिक पुरूष दिन खास करायचा असेल मग तुमचे वडील, भाऊ, मित्र यांच्यासह खास पुरूषांचं तुमच्या आयुष्यात असणं सेलिब्रेट करण्यासाठी आणि त्यांचा दिवस खास करण्यासाठी गिफ्ट देऊन स्पेशल बनवा. International Men's Day 2019: जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? यामागील इतिहास आणि यंदाची थीम सविस्तर जाणून घ्या.
यंदाचा पुरूष दिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आयत्या वेळेस नेमकं काय गिफ्ट घ्यायचं हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील पुरूषांसाठी खास ठरतील अशा या काही गिफ्ट आयडीयाज
1: पुस्तकं
'वाचाल तर वाचाल' हा संस्कार आपल्याला लहानपणापासून शिकवला आहे. पण आजकाल डिजिटल होत चाललेल्या युगात खास पुस्तकं विकत घेऊन ती वाचण्याची संस्कृती कमी होत आहे. त्यामुळे तुम्ही एखादं खास पुस्तक नक्कीच गिफ्ट करू शकता. पुस्तकं वाचण्याची सवय नसेल तर आजकाल ऑडिओ बुक्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याचं सबस्क्रिप्शन देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता.
2: स्पा व्हाऊचर
सौंदर्याची काळजी केवळ स्त्रियांनाच असते असे नाही तर पुरूषही आजकाल त्यांच्या सौंदर्यासाठी खास वेळ काढतात. स्पा सेंटरमध्ये सौंदर्य खुलवण्याच्या सोबतीने मसाज देखील केला जातो. त्यामुळे यंदा मेन्स डे चं औचित्य साधून तुम्ही स्पा व्हाऊचर देऊन त्यांचा हा दिवस खास करू शकाल.
3: ग्रुमिंग कीट
पुरूषांनाही त्यांच्या चेहर्याची काळजी घेण्याची हौस असते. मग यंदा तुमच्या आयुष्यातील पुरूषांना ग्रुमिंग कीट गिफ्ट देऊ शकता. नोव्हेंबर महिन्यात अनेक पुरूष दाढी करत नाही. त्यामुळे रूबाबदार दाढी वाढवायची असेल तर त्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मग त्यासाठी यंदा ग्रुमिंग कीट गिफ्ट देऊन त्यांचा दिवस खास बनवा.
4: हेल्थ चेकअप अपॉंईंटमेंट
आजकाल कामाच्या धावपळीमध्ये अनेकदा पुरूष आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रीयांच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे असल्याने त्यांच्या शरीराची तपासणी एका विशिष्ट टप्प्यानंतर होते. मात्र पुरूषांच्या बाबतीत तसं जाणीवपूर्वक केलं जात नाही. धकाधकीच्या होत चाललेल्या जीवनात अनेक सायलंट किलर समजल्या जाणार्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी किमान मेन्स डे चं औचित्य साधून तुमच्या आयुष्यातील पुरूषांना गिफ्टच्या स्वरूपात त्यांना हेल्थ चेकअपची आठवण करून द्या.
5: वाईन / बीअर
मद्यपान हे शरीरासाठी त्रासदायक आहे. मात्र काही वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रमाणात घेतलेली वाईन, बीअर ही शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे यंदा मेन्स डे सेलिब्रेशन थोडं खास करायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील त्या खास पुरूषाला आवडीनुसार बीअर किंवा वाईन गिफ्टच्या स्वतूपात देऊ शकता.
1998 साली त्रिनिदाद अँड टोबेगोमध्ये पहिल्यांदा 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायला सुरुवात झाली. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी जागतिक पुरुष दिनाची संकल्पना पुढे आणली. यानंतर जगभरात 70 हून अधिक देशांमध्ये जागतिक पुरुषदिन साजरा केला जातो. यूनेस्कोने देखील जागतिक पुरुष दिनाचं महत्त्व जाणून त्याचं कौतुक केलं आहे.