
Happy 74th Independence Day 2020: आज, आपण भारताचा 74 वा स्वातंंत्र्य दिन साजरा करत आहे, यंंदा पहिल्यांदाच आत्मनिर्भर भारत या थीम वर आधारित स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. काही वेळापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्व्जारोहण करण्यात आले आहे. कोरोनाच्या संंकटामुळे यंंदा किंंचित साध्या स्वरुपात हा सोहळा साजरा होत असला तरी काल मध्यरात्रीपासुनच सोशल मीडियाच्या माध्यमातुन अनेकांनी शुभेच्छा देत ऑनलाईन सेलिब्रेशन मात्र जोरदार सुरु केले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातुन शुभेच्छा देउ इच्छित असाल तर त्यासाठी आम्ही काही खास मराठमोळी शुभेच्छापत्र तयार केली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे हे मराठी संदेश तुमच्या मित्र, प्रियजन, कुटुंंब, नातेवाईक व ऑनलाईन परिवारासोबत शेअर करुन आजच्या या खास दिवसाचा आनंंद द्विगुणित करुयात.
74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मराठी शुभेच्छा





दरम्यान, आज पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण देताना सुद्धा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. देश तेव्हाच स्वतंंत्र होईल जेव्हा आपण आत्मनिर्भर होऊ त्यामुळे व्होकल द लोकल या उपक्रमावर भर द्या. जागतिक स्तरावरुन भारतात गुंतवणुक होत आहे तिचा देश हितासाठी पुरेपुर वापर करा अशा शब्दात मोदींनी देशवासियांनी संबोधित केले आहे. आजच्या या खास क्षणी लेटेस्टली परिवाराकडुन सुद्धा खुप खुप शुभेच्छा!