Independence Day 2019 Quotes: स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे महत्त्वपूर्ण कोट्स
Representational Image. (Photo Credit: File Photo)

India Independence Day 2019 Quotes: 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) म्हणून साजरा केला जातो. आपल्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळणार नाही, अशा मस्तीत असलेल्या ब्रिटीशांच्या सत्तेला भारतीयांनी आव्हान दिले. प्रदीर्घ संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हाच भारत यंदा आपला 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. तोही मोठ्या दिमाखात. स्वातंत्र्य ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. ते मिळविण्यासाठी प्रचंड कष्ठ आणि श्रम घ्यावे लागतात. भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणाची, प्रेमाची आणि घराची आहूती दिली. अशा या स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पुन्हा सांगण्यासाठी जगभरातील विचारवंत, नेते आणि संशोधकांचे हे काही अमूल्य विचार (Independence Day Quotes).

 स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे महत्त्वपूर्ण कोट्स

Bal Gangadhar Tilak | Representational Image. (Photo Credit: File Photo)

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच - लोकमान्य टिळक

Vinoba Bhave | Representational Image. (Photo Credit: File Photo)

स्वतंत्रता जन्मसिद्ध हक्क नाही, कर्मसिद्ध हक्क आहे - विनोवा भावे

Mahatma Gandhi | Representational Image. (Photo Credit: File Photo)

स्वातंत्र्याची कोणत्याही प्रकारे किंमत करता येत नाही. स्वातंत्र्य म्हणजे जीवन. कोणतीही किंमत मोजून ते मिळवलेच पाहिजे - महात्मा गांधी (हेही वाचा, Indian Independence Day 2019: स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात प्रभावी भाषण कसे कराल?)

Abraham Lincoln | Representational Image. (Photo Credit: File Photo)

जे लोक दुसऱ्यांना स्वातंत्र्य देऊ शकत नाही, त्यांना स्वत:ही तो उपभोगण्याचा हक्क नाही - अब्राहम लिंकन

Benjamin Franklin | Representational Image. (Photo Credit: File Photo)

जिथे स्वातंत्र्याचे वास्तव्य आहे तोच माझा देश आहे - बेंजामिन फ्रेंक्लिन

भारत यंदा आपला 73वा स्वातंत्र्य दिन (73rd Independence Day ) साजरा करत आहे. देशाचे पंतप्रधान राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन आपला राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिनी फडकवतात. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, संस्कृती यांचे प्रदर्शन केले जाते. ज्यामुळे देशवासीयांना आपल्या क्षमतेचा अभिमान वाटेल आणि शत्रूंना धडकी भरेन. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात. परंतू, त्याशिवाय विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.